रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काळीमिरीचा वापर कसा करावा?

0
192

भारतीय मसाल्यामध्ये मुख्य मसाला म्हणून काळी मिरीचा वापर केला जातो. भारतात तयार होणा-या काळी मिरीस चांगला वास व उत्कृ ष्टि दर्जा असल्या मुळे जागतियक काळी मिरीच्याा 90 टक्केत निर्यात एकटया भारतातून होते. भारतात उत्पाीदन होणा-या एकूण काळीमिरी पैकी 98 टक्के उत्पाादन एकटया केरळ राज्याकत होते. महाराष्ट्रा तील कोकण विभागात तुरळक मिरी लागवड आढळते.काळी मिरीचे वैज्ञानिक नाव “पायपर निग्राम” असून त्याचा वापर औषध आणि मसाला असा दोन्ही करता येतो. काळ्या मिरीमध्ये बऱ्याच प्रकारची खनिजं आणि विटामिन्सदेखील असतात. यामध्ये विटामिन ए, विटामिन सी, विटामिन के आणि विटामिन बी 6 चं भरपूर प्रमाण असते.आज आपण जाणून घेऊयात काळी मिरीचे आरोग्यदायी फायदे. सर्दी आणि नाक दुखत असल्यास काळ्यामिरीमुळे आराम मिळतो. खोकला कमी होतो. सर्दी झाल्यास काळीमिरी आणि लसूण एकत्र करून खावे. तसेच गरम दुधाबरोबर काळीमिरी पूड घेतल्यास फायदा होतो.सर्दीमुळे छातीत दुखत असल्यास चहा किंवा दुधात मिरपूड मिसळून घेतल्याने आराम मिळेल. तसेच सकाळी काळीमिरी गरम पाण्यासोबत घेतल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते.काळी मिरी नियमितपणे सेवन केल्यास वजनावर नियंत्रण ठेवता येते. काळी मिरी नियमितपणे सेवन केल्यास शरीरात अतिरिक्त चरबी जमा होत नाही. काळ्या मिरीमध्ये पिपेरिनमध्ये अँटी ऑक्सिडंट असते.काळ्या मिरीच्या सेवनाने तणाव आणि डिप्रेशन पासून सुटका मिळते.तुमच्या जेवणाची चव अधिक चांगली करण्याबरोबरच काळी मिरी तुमची भूक वाढवण्याचं काम चांगल्या प्रकारे करते. आपल्या सुवासाच्या माध्यमातून काळी मिरी तुमची भूक वाढवण्यास मदत करते.आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here