चिकू हे असे फळ आहे जे प्रत्येक हंगामात सहज उपलब्ध होते. चिकू खूप चवदार फळ आहे. चिकुमध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी, फॉस्फरस आणि लोह हे घटक असतात. चला तर जाणुन घेउयात चिकू खाण्याचे आरोग्यदायी फायदे. चिकूमध्ये कॅल्शियम फॉस्फरस आणि लोह जास्त प्रमाणात असते यामुळे चिकू हाडांसाठी खूप फायदेशीर आहे.हाडे मजबूत बनविण्यासाठी चिकूचे सेवन तुम्ही करू शकता. चिकूमध्ये ग्लूकोज हा घटक असतो, जो शरीराला त्वरित उर्जा देण्याचे काम करतो. दररोज व्यायाम करणार्यानी चिकू खाल्ला पाहिजे.रोजच तुमची जास्त चिडचिड होत असेल तर चिकू खाल्याने मन शांत ठेवण्यासाठी चिकू खा तुम्हाला फरक जाणवेल. चिकू खाणे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे, कारण त्यात व्हिटॅमिन ए आहे, जे आपल्या डोळ्यांसाठी खूप चांगला असते. चिकू खाल्याने आपल्या म्हातारपणात डोळ्यांची समस्या तितकी जास्त प्रमाणात जाणवनार नाही.अन्न पचनाची समस्या असल्यास चिकुचे सेवन करा त्यातील फायबर बद्धकोष्ठता दूर करते. चिकू खाल्याने त्वचेची चमक कायम राखण्यास मदत मिळेल. चिकूमध्ये व्हिटॅमिन ई असते जे आपल्या त्वचेला ओलावा देते आणि आपली त्वचा निरोगी आणि सुंदर बनवते. म्हणून चिकू खाणे आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे.