मक्याचे कणीस खाण्याचे आरोग्यदायी फायदे

0
332

पावसाळा सुरू झाला की बाजारात मक्याच्या कणसाचा खमंग वास घुमू लागतो. मक्याचे कणीस हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या तोंडाला पाणी आणणारा आणि आवडता पदार्थ आहे. लिंबू मीठ लावून चवीने खाल्ले जाणाऱ्या कणसाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. चला तर जाणून घेऊयात मक्याचे कणीस खाण्याचे आरोग्यदायी फायदे.मका आपल्या हाडांना बळकटी देतो. यात आर्यन, मॅग्नेशियम ही तत्वे हाडांना मजबूत करतात तसेच यात झिंक आणि फॉस्फरस देखील असते हे आपल्या हाडांच्या आजारांपासून आपला बचाव करते.मक्याच्या कणसाचे दाणे काढून उकडून खाणे अनेकांना आवडते. मक्याचे कणीस उकडताना त्या पाण्यात थोडे मीठ व हळद टाकून उकडले असता. याचा अनेक पटीने फायदा होतो. याने शरीरातील वात व पित्त विकार नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.अनेकदा काम करताना आळस येतो किंवा शरीर दमल्यासारखे वाटते अशा वेळी मक्यामधील भरपूर प्रमाणात असलेले कार्बोहायड्रेट शरीराला नवीन ऊर्जा देतात. शरीरात उत्साह आणतात व पोट भरल्यासारखे वाटून उत्साह टिकून राहतो.मक्याचे कणीस खाऊन झाल्यानंतर मधल्या भागाचे दोन तुकडे करा. त्या तुकड्यांच्या आतील भागाचा वास घेतला असता सर्दी देखील कमी होते.कफच्या समस्येसाठी देखील मक्याचे कणीस उपयुक्त आहे. कणीस खाऊन झाल्यानंतर मधला भाग वाळवुन ठेवा. तो पूर्ण वाळल्यानंतर त्याला जाळा व उरलेली राख पाण्यात टाकून त्याची वाफ घ्या. त्या वाफेने कफाच्या समस्येपासून आराम मिळतो.हिमोग्लोबिन अथवा शरीरात रक्ताची कमतरता असेल तर उकडलेले मक्याचे कणीस फायदेशीर आहे. रक्ताची कमतरता असेल तर महिन्यातून किमान एकदा तरी कणीस उकडून खाल्ले पाहिजे. याने पोटही मजबूत होते.मका हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यातील बायोफ्लेवोनॉयड्स, कॅरोटेनॉयइस, व्हिटॅमिन व फायबर्स ही तत्वे असतात. हे आपल्या शरीरातील अतिरिक्त फॅट कमी करतात. मक्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात रहाते.मक्यामध्ये व्हिटॉमिन ए आणि बीटा कॅरेटीन हे गुणधर्म आढळतात. त्यामुळे दृष्टी अधिक तीक्ष्ण होते. मका खाणे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.मका पित्तनाशक आहे. यातील फायबरमुळे पोट साफ होण्यास मदत होते. मका खाणाऱ्यांना पित्त, बद्धकोष्ठता असे त्रास होत नाही. यामुळे पोटाच्या अनेक समस्या कमी होतात.मक्याच्या सेवनामुळे दात मजबूत होतात त्यामुळे खास करून लहान मुलांनी मका खाणे आवश्यक आहे. दातांच्या आरोग्यासाठी मका लाभदायक आहे. मक्यामुळे वाढत्या वयाच्या खुणा दिसत नाहीत. याच्या सेवनाने शरीरातील अँटी-ऑक्सीडेंट्सचे प्रमाण 50 टक्क्यांनी वाढते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here