मका खरेदी बाबतीत सरकारी टोलवाटोलवी! नवीन मका लवकरच येणार तरीही राज्यातील हजारो शेतकरी मका खरेदीच्या प्रतीक्षेत !

0
173

केंद्र शासनाने गेल्या आठवड्यात २५ हजार टन खरेदीला मान्यता दिली. मात्र, अवघ्या पाच ते सहा दिवसांतच ही खरेदी पूर्ण झाल्याने राज्यात मका खरेदी बंद झाली. त्यामुळे राज्यातील हजारो शेतकरी मका खरेदीच्या प्रतीक्षेत आहेत.
जामनेर;- [मनोजकुमार महाले ] राज्य  शासनाला शेतकऱ्यांची खरच चिंता वाटत असेल तर त्यांनी मका खरेदीची केंद्र शासनाकडे परवानगी मागावी.केंद्र शासन मका खरेदीला परवानगी द्यायला तयार आहे; पण राज्य शासनाने अद्यापपर्यंत तशी मागणी केलेली नाही,असे केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण व्यवस्था राज्यमंञी रावसाहेब दानवे यांनी ‘आयबीएन’ शी बोलताना स्पष्ट केले.त्यामुळे रावसाहेब दानवे यांनी मका खरेदीचा चेंडू राज्य शासनाकडे टोलावला आहे.परीणामी, आता राज्य शासन मका खरेदीची मागणी केंद्राकडे का करत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. केंद्र शासनाने गेल्या आठवड्यात 25 हजार टन खरेदीला मान्यता दिली .माञ,अवघ्या पाच ते सहा दिवसांत ही खरेदी पुर्ण झाल्याने आता मका खरेदी बंद झाली .त्यामुळे राज्यातील हजारो शेतकरी मका खरेदीच्या प्रतिक्षेत आहे.जळगाव जिल्ह्यात अनेक दिवसांपासुन शेतकऱ्यांचे ट्रँक्टर खरेदी केंद्रावर उभे आहेत .जिल्ह्यात 18 हजार तर राज्यात 48 हजारांच्या जवळपास शेतकरी खरेदीच्या प्रतिक्षेत आहे दरम्यान भरडधान्य 15 आँगस्टपर्यंतच खरेदी करणे शक्य आहेअसे स्पष्ट करुन मंञी दानवे म्हणाले , की राज्य शासनाने तात्काळ मागणीचा प्रस्ताव देणे आवश्यक आहे.अर्थात खरेदी साठी केंद्र शासन पैसे देते.राज्य शासनाने फक्त बारदान उपलब्ध करुन द्यायचे  असते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here