अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कॅन्सर, उपचारासाठी परदेशी जाण्याची शक्यता

0
146

अभिनेता संजय दत्तला तिसऱ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कर्करोग झाला आहे. संजय दत्त उपचार घेण्यासाठी परदेशातही जाण्याची शक्यता आहे. फिल्म ट्रेड अॅनालिस्ट कोमल नाहटा यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वीच संजय दत्तला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र संजय दत्तला डिस्चार्ज देण्यात आला आता त्याला लंग कॅन्सर झाला आहे. त्याला लवकर आराम पडो असंही नाहटा यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.आजच अभिनेता संजय दत्तने एक ट्विट करुन कामातून ब्रेक घेत आहोत असं म्हटलं होतं. हा ब्रेक वैद्यकीय उपचारासाठी हा ब्रेक असून मी लवकरच परत येईन असंही संजय दत्तने म्हटलं होतं. शनिवारी संध्याकाळी संजय दत्तला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अस्वस्थता आणि श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता त्याला तिसऱ्या स्टेजचा कॅन्सर झाल्याचं स्पष्ट झालं आहे. संजय दत्तची करोना चाचणीही झाली होती. ज्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता.                                            आज केलेल्या ट्विटमध्ये संजय दत्तने काय म्हटलं होतं?     

नमस्कार मित्रांनो, काही वैद्यकीय उपचारांसाठी मी कामापासून छोटा ब्रेक घेतो आहे. माझे कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणी माझ्यासोबत असून माझ्या प्रकृतीविषयी चिंता करू नका असं आवाहन मी चाहत्यांना करतो. त्याचप्रमाणे तब्येतीविषयी काही अफवा पसरवू नका. तुमच्या प्रेमाच्या आणि शुभेच्छांच्या आधारे मी लवकरच परत येईन’, असं ट्विट संजय दत्तने केलं आहे.

संजय दत्तने २९ जुलै रोजीच त्याचा ६१ वा वाढदिवस साजरा केला होता. आता संजय दत्तला कॅन्सर झाला आहे. हा फुफ्फुसाचा कॅन्सर असून तिसऱ्या स्टेजचा कॅन्सर आहे. फिल्म ट्रेड अॅनालिस्ट कोमल नाहटा यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here