कांदिवली ;- [आयबीएन एकमत वृत्तसेवा] फुले शाहु आंबेडकर विचार धारेच्या माध्यमातून प्रबोधन करणाऱ्या एका सामाजिक कार्यकर्त्यांवर रामदासी बैठकीतील सुमारे २०० गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला.याबाबत कांदिवली समता नगर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे.हल्ला होऊन १ महिना १७ दिवस उलटूनही आरोपी मोकाट असल्याने पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सचिन गणपत रामाणे राहणार ( रा.कांदिवली पुर्व) असे हल्ला झालेल्या सामाजिक कार्यकर्त्यांचे नाव आहे.लॉकडाऊन असतानाही २०० जणांचा जमाव रामाणे यांच्या घरांवर चाल करून आला होता.रामाणे हे गेली अनेक वर्षे समाज प्रबोधनाचे काम करत आहेत.सोशल मीडियाच्या माध्यमातून लेखन,व्हिडिओ बनवून ते प्रसारित करतात.गोरगरिबांची आर्थिक पिळवणूक संविधानिक मार्गाने ते मांडत असतात.याचाच राग येऊन रामदासी बैठकीतील २०० दासांनी २५ जूनला रामाणे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.माझ्या घराचा पत्ता कुणी दिला अशी विचारणा रामाणे यांनी त्या लोकांना केली,यावर त्याची बोलती बंद झाली.यातील काही लोक आक्रमकपणे रामाणे व त्याच्या बहिणीच्या अंगावर धावून जात होते.एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर याला ठोकून काढा अशा प्रकारची दमदाटीची भाषा ते वापरत होते.तेवढ्यात रामाणे यांच्या पत्नीने त्यांच्या ऑफिसमधून १०० नंबरवर कॉल केला.समतानागर पोलीस ठाण्यात जाऊनही आल्या.परंतु कोविडचे कारण पुढे करत पोलीस उशिराने आले.जवळजवळ दोन तास या लोकांचा धिंगाणा सुरू होता.रामाणे यांच्या लिखाणात कोणतेही आक्षेपार्ह नाही तर त्यांनी जी पोस्ट फॉरवर्ड केली त्याबाबत त्याचा राग असल्याचे या जमावाने सांगितले.
या हल्ल्याचे खरे सुत्रधार प्रदीप केदारी, सचिन केदारी,विक्की ठसाले,सुशांत खंदरकर,राजु कांबळे असल्याचे रामाणे यांनी २९ जूनला पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.या हल्ल्याची पहिली तक्रार रामाणे यांची पत्नी रुपाली यांनी केली आहे.अद्यापही या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. रुपाली यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की प्रदिप केदारी व सचिन केदारी हे दोघे बंधू आम्हांला बैठकीत बसण्यासाठी जोर जबरदस्ती करत होते.परंतु आम्ही त्याला नकार दिला.एवढेच नव्हे तर २ वर्षापूर्वी त्यांना भररस्त्यात अडवून बैठकीबाबत विचारले होते.२५ जूनचा हल्ला घडला तेव्हा त्यांच्या घरी दोन नणंदा सासू सासरे व पती होते.प्रदिप केदारी व अन्य लोक माझ्या नणंदेच्या अंगावर धावून येत होते.आम्ही कोण आहोत हे तुम्हांला माहीती आहे का?असा धमकीवजा इशारा ते लोक देत होते.यांच्या पासून आम्हांला धोका असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान या हल्ल्याची दखल बामसेफ पुरस्कृत राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्तीने घेतली.यासंदर्भात नफने समता नगर पोलीस ठाण्याला पत्रही दिले आहे.रामाणे हे नफचे कार्यकर्ते आहेत.ते फुले शाहू आंबडेकर विचारधारेचा प्रचार करतात.ते मुळचे कोकणातील असल्याने तेथील धार्मिक कर्मकांड व अंधश्रद्धा याबाबत त्यांना माहिती आहे.म्हणून ते सातत्याने याविरोधात प्रहार करतात.घडलेला घटनाक्रम पाहता हा पूर्वनियोजित कट होता.जमा झालेले २०० लोक गुंड प्रवृत्तीचे आहेत.या जमावावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी नफचे मुंबई अध्यक्ष सुधीर बामणे यांनी पत्राद्वारे केली आहे.तसेच कुणबी समाजोन्नती संघ मुंबई पुरस्कृत कुणबी युवाचे अध्यक्ष माधव कांबळे सचिव सुनील गावडे संभाजी ब्रिगेडचे उत्तर मुबंई जिल्हाध्यक्ष सागर पगारे कार्याध्यक्ष सुरज दिघे ईशान्य मुबंई कार्याध्यक्ष नितीन बारस्कर यांनीही अशा प्रकारे हल्ला करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई करावी अशी मागणी पत्राद्वारे केली आहे….