दोडक्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे वाचून तुम्हीही व्हाल थक्क; जाणून घ्या!

0
424

मुंबई | दोडका, अर्थात शिराळे, (लेखनभेद, अन्य नावे: दोडकेशिरांचा दोडका, शिराळे, कोशातकी; शास्त्रीय नाव: Luffa acutangulaलुफ्फा अक्यूटॅंगुला ; इंग्लिशRidged luffaरिज लुफ्फा 😉 हा दक्षिण आशियापासून आग्नेय आशिया व पूर्व आशियापर्यंतआढळणारा एक वेल आहे. याला दंडगोलाकार, शिरा किंवा कंगोरे असलेल्या सालीची फळे येतात. याची कोवळी फळे भाजी म्हणून पाककृती बनवण्यासाठी वापर होतो, तसेच याची वाळलेली फळे अंघोळीसाठी नैसर्गिक स्पॉंज म्हणून वापरली जातात. दोडक्यांचा वापर आयुर्वेदात, उलटी व जुलाबाचे औषध म्हणून केला जात असे. अनेक लोकांच्या आहारात दोडक्याची भाजी सामान्यपणे आढळत असते. याच दोडक्याला काही ठिकाणी शिरोळे तर काही ठिकाणी कोशातकी अशा विविध नावांनी ओळखले जाते. दोडका खाताना काहीजण नाक मुरडत असतात. पण हाच दोडका आपल्या आरोग्यासाठी भरपूर लाभदायी आहे.

सामान्यपणे आपण खातो तो गोड दोडका म्हणून ओळखला जातो. या गोड दोडक्याचे अनेक औषधी गुण असतात. दोडका ही एक पथ्यकर भाजी आहे. मधुमेह आणि स्थौल्य यांसारख्या आजारात दोडका उकडून खाल्ल्यास लाभदायी ठरतो.

सतत पाय दुखणे, पोट फुगणे, सतत काम केल्याने थकवा येणे, थोडी थोडी लघवी होणे या विकारांमध्ये दोडक्याच्या फोडी किंवा भाजी खाल्ल्यास अथवा दोडक्याचा रस पिल्यास या विकारांपासून सुटका मिळते.

ज्या लोकांना आपलं वजन वाढवायचं आहे, त्या वाक्तींनी आहारात दोडक्याचा समावेश केल्यास वजन वाढण्यास मदत होते. तसेच दोडक्याच्या मुळांचा उपयोग मुतखडा पाडण्यासाठी होतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here