खजूर – छोटेसे बृंहण करणारे उपयुक्त फळ!

0
149

खजूर – छोटेसे बृंहण करणारे उपयुक्त फळ!

खजूर, उपवासाला घेण्यात येणारे, ताकद वाढविणारे फळ. खजुराचे फायदे बऱ्याच जणांना माहितीच असतात. ताकद येते किंवा रक्त वाढविते हे बऱ्याच जणांना माहिती असेल. असे हे खजुर शरीराला किती व कशाप्रकारे उपयुक्त आहे ते बघूया –आयुर्वेदात खर्जूर हे फळवर्गात वर्णित आहे. मधुर रसाचे, मांसवृद्धी करणारे, शुक्र दौर्बल्य दूर करणारे, थंड प्रकृतीचे खजूर सांगितले आहे.दाह कमी करणारे आहे. आपल्याला असे वाटते की खजूर गरम असतो पण असे नाही.खजूर हे उत्तम श्रमहर सांगितले आहे. अति परिश्रम खूप चालल्यानंतर जो थकवा येतो म्हणजेच मांस पेशीमधील साखरेचे प्रमाण कमी होते अशा अवस्थेत खजूर पाण्यात भिजवून त्याचे सरबत दिल्यास श्रमपरिहार लगेच होतो. आजाराने क्षीणता अशक्तपणा आला असेल तर सातूचे पीठ भिजलेले खजूर पाण्यात मिसळून थोडे थोडे द्यावे. खजूर पोट साफ करणारे आहे परंतु जास्त खाल्यास बद्धकोष्ठता करणारे आहे. खजूर स्निग्ध गोड असतो त्यामुळे शरीरात, मळ रुक्ष असेल मल प्रवर्तना करीता कुंथावे लागत असेल तर खजूर खाणे उपयोगी आहे.खजूर वृष्य म्हणजेच वाजीकर सांगितले आहे. त्यामुळे शुक्र धातुक्षय दूर करणारे आहे. प्रजनन संस्थेवर खजूर घेणे उपयोगी ठरते. खजूर तूपात भिजवून दिल्यास फायदेशीर आहे. खजूर रक्त वृद्धीकर सांगितले आहे. रक्तस्त्राव किंवा नाक फुटणे, गुदगत रक्तस्त्राव होऊन जो रक्तक्षय व अशक्तपणा येतो त्यावर खजूर मनुका गरम पाण्यात भिजवून थंड झाल्यावर प्यावे. रक्त वाढते शिवाय अशक्तपणा कमी होतो. खजूर हाडांच्या स्वास्थ्याकरीता चांगले आहे. सियाटिका कटीशूल असल्यास खजूर खावे. नर्व्हस सिस्टीमला बल देण्याचे काम खर्जूर करते त्यामुळे डोक्याला ताण येणे भ्रम भोवळ येणे या तक्रारींवर खर्जूर दूध किंवा तुपात भिजवून घ्यावे. पित्त वाढल्याने वांती होत असेल खजूर थंड गोड वातपित्तशामक असल्याने उपयोगी आहे. उष्णतेमुळे वारंवार तहान लागत असेल किंवा घसा कोरडा पडत असेल तर खजूर भिजवून पाणी घ्यावे. खजूर हृदयाला हितकर रक्तपित्त कमी करणारे रक्तदाब कमी करणारे आहे. त्यामुळे आहारात खजूराचा वापर करावा. पुष्टी करणारा असल्यामुळे वजन वाढवायचे असल्यास खजूर खावा. मासिक स्त्राव जास्त होत असेल आणि अशक्तपणा आला असेल तर खजूर आहारात घ्यावा. खजूराची निरा देखील खूप आरोग्यकारक आहे. अशक्तपणा दूर करणारी आहे. खजूर टीबी मुळे उत्पन्न अशक्तपणामधे टॉनिक प्रमाणे काम करते. शरीर सुकणे किंवा वजन कमी होत असेल तर खजूर आहारात घेणे उपयोगी ठरते. शरीरात आग होत असेल त्यामुळे घसा कोरडा जाणवत असेल तर खजूर पाण्यात भिजवून केलेले सरबत खूप फायदेशीर आहे. खजूर गोड पचायला जड असतो मधुमेह, मंदाग्नि असल्यास घेऊ नये. खजुराचे पौष्टीक लाडू मुलांकरीता उत्तम आहार आहे. हाड रक्त दोन्ही पुष्ट होण्याकरीता हे लाडू उपयुक्त ठरतात. अहाळीव खीरमधे खजूर टाकून घेऊ शकतो. हाडांना मजबूती मिळते. उन्हाळा शरद ऋतुमधे ज्यावेळी उष्णता खूप जास्त असते अशावेळी खजूरचे सरबत किंवा खजुराचीचिंच चटणी आहारात घेतल्यास उष्णतेचा त्रास होत नाही. असे हे बहुगुणी खजूर पाचनशक्तीचा विचार करुन रोजच्या आहारात नक्की असावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here