वेलची खाण्याचे आरोग्यदायी फायदे….

0
410

आपल्याकडे स्वयंपाकाची चव वाढावी म्हणून वेगवेगळे पदार्थ वापरले जातात त्यापैकी रोज वापरली जाणारा पदार्थ म्हणजे वेलची. अनेक रोगांवर आजारांवर गुणकारी असल्याने आयुर्वेदात वेलचीला विशेष स्थान आहे.वेलची, वेलदोडा, विलायची, इलायची अशा वेगवेगळ्या नावाने ओळखली जाणारी वेलची रोजच्या आयुष्यातील अनेक त्रासांवर गुणकारी आहे. चला तर जाणून घेऊयात वेलचीचे आरोग्यदायी फायदे.हिवाळा, पावसाळ्यात होणारा कफ व खोकला ही नित्याचीच बाब आहे. खास करून लहान मुलांना हा त्रास लगेच होतो. अशावेळी रोज चहा बनवताना वेलची व तिच्या सालीचा उपयोग केल्यास कफ व खोकला होत नाही. चहा घेत नसल्यास पाण्यात उकळूनही याचे सेवन करू शकता…अपचन, गॅस याची समस्या वारंवार होत असेल तर जेवण झाल्यावर दोन वेलच्या तोंडात टाकून चघळव्या व चावून खाव्या. असे केल्याने अन्न पचण्यास मदत होते.वेलचीमध्ये अँटी बॅक्टिरियल गुणधर्म आढळतो. जेवण झाल्यावर वेलची खाल्ल्याने तोंडाची दुर्गंधीही निघून जाते. वेलची चघळण्याने ऍसिडिटीच्या त्रासापासून सुटका होते. ऍसिडिटीवर वेलची रामबाण उपाय आहे.वेलचीमध्ये मुबलक प्रमाणात पोटॅशिअम आणि फायबर आढळते. वेलची तुमच्या शरीरातील रक्तभिसरण प्रक्रिया सुरळीत करण्यास मदत करते. हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी वेलची खाणे उपयुक्त आहे.ज्यांना प्रवासात वारंवार उलटीचा त्रास होतो त्यांनी स्वतः बरोबर वेलची ठेवावी. वेलची चघळल्याने उलटी, मळमळ हा त्रास होत नाही. वेलचीमध्ये लोह, व्हिटॅमिन सी, बरोबर अनेक जीवनसत्वे असतात हे आपल्या शरीराला सदृढ ठेवतात.यातील पोटॅशिअम, मॅग्नेशिअम असे अनेक घटक पोटाची चरबी कमी करण्यास मदत करतात. रोज रात्री झोपताना दोन वेलची खा त्यावर कोमट पाणी प्या. या उपायाने पोटाचा घेर कमी होतो.आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. अशीच वेगवेगळ्या विषयावरील माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज/वेबसाइटला लाइक करा. आमच्या पोस्ट सगळ्यात आधी पाहण्यासाठी पोस्ट नोटीफीकेशन सुरू करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here