मित्रांनो नमस्कार तुमच्या आमच्या सर्वांच्या परिचयाचे एक झाड म्हणजे हे चिंचेचे झाड. चिंच म्हणले की तोंडला पाणी तर येणारच. तुम्हाला आठवते का आपण आपल्या बालपणी या चिंचेची कोवळी पानं खायचो. थोडीशी आंबट थोडीशी तुरट अशी छान चव असणारी पान खरं तर किती फायदेशीर आहेत हे त्या बालपणी आपल्याला ठाऊक नव्हते.मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की चिंचेची कोवळी पाने खाल्ल्याने आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल मात्र या चिंचेमध्ये असे गुण आहेत की जे आपले आरोग्य चांगले ठेवतात. आज-काल मॉडर्न युगात अशाप्रकारे चिंचेची पाने तोडून खाण हे इतक चांगलं मानलं जात नाही. लोक म्हणतात प्रदूषण वाढले आहे त्या पानावर धूळ बसलेली असते. खरी गोष्ट आहे. तुमच्या भागात तुमच्या शहरात जर अशाप्रकारे चिंचेच्या झाडावर प्रदूषण असेल धूळ असेल तर मित्रांनो थोडे मिठाच्या पाण्यामध्ये चांगली धुऊन घ्या आणि मग ती पण तुम्ही खा. साधारणता एप्रिल-मे जुन् या कालावधीमध्ये तुम्हाला ही जी कोवळी पणे आहेत ती खायला मिळतील. चला तर मग जाणून घेऊया या पानांची कोणकोणते फायदे आहेत.. शेवट पर्यन्त नक्की वाचा.मित्रांनो चिंचेची कोवळी पाने तशी ही खाल्ली जातात. त्याचबरोबर त्याची भाजीही करतात. आपल्या लहानपणी आपली आई आपली आजी चिंचेच्या पानाची भाजी करून द्यायची. खूप रुचकर लागायचे ते. मित्रांनो या पानांमध्ये लोह (iron) भरपूर आहे. सध्या आपण पाहतो बऱ्याच जणांना रक्त कमी असत आणि मग ऍनिमिया होतो ॲनिमिया म्हणजे काहीतरी विशेष करून स्त्रियांमध्ये त्यांना ॲनिमिया झाला तर छोटी छोटी सुद्धा कामे केली तरी सुद्धा दम लागतो. धापा लागतात. त्याला आपण ॲनिमिया असं म्हणतो. रक्त कमी असल्यामुळे हा सर्व प्रॉब्लेम होतो. मित्रांनो तुम्ही जर या चिंचेची कोवळी पाने खाऊन लागलात. तुम्ही जर या पानांची भाजी केली तर त्यामधून लोह पुरवतो. कोणताही साईड इफेक्ट्स दुष्परिणाम याचा होत नाही.दुसरा घटक आहे :- फॉस्फरस. आपली हाडं आपले दात मजबूत ठेवण्यासाठी फोस्पोरसचे फार मोठे योगदान आहे. आणि हे फॉस्परस नावाचं खनिज आहे ते ह्या पानांमध्ये मुबलक आहे. आणि म्हणून आपली हाडे मजबूत करण्यासाठी किंवा सांधेदुखी सारखा त्रास कमी करण्यासाठी या पानांचा उपयोग होतो. तिसरा घटक आहे :- क्लोरीन.याच्यामध्ये क्लोरीन भरपूर आहे तांबे आहे गंधक आहे. मित्रांनो सर्वच्या सर्व खनिजे आपल्या शरीराच्या एकूण कार्यक्षमता वाढणारी आहेत. आपला आरोग्य सुधारणारी आहेत. एकंदरीत हे आपले आरोग्य सुधारणारी पान आहेत.इतर फायदे :- उन्हाळ्याच्या दिवसात गज करण्याचा त्रास वाढतो. जर तुम्ही ही पाने खाली तर गजकर्ण पासून आपल्याला मुक्ती मिळू शकते. ज्यांना रक्ताचे विकार आहेत रक्त अशुद्ध असेल तर काय होतय चेहऱ्यावर बारीक बारीक फुटकुळ्या येतात त्याला आपण मुरूम म्हणतो पिंपल्स म्हणतो. जर तुम्ही पाने खाल्ली तर पिंपल पासून चांगला बचाव होतो. रक्त शुद्ध करणारे रक्ताचा विकार कमी करणारे अशी ही पाने आहेत. ज्यांना दात-दुखी चा त्रास आहे त्यांनीही पाने चावून चावून खा.डोळ्यांचे अनेक विकार कमी करणारे अशीही पाने आहेत. ज्यांना वाटतं भविष्यात आपल्याला डोळ्यांचे विकार होऊ नयेत. त्यांनी ह्या पानांचे सेवन केलेले अति उत्तम. आज-काल ट्यूमर चे प्रमाण खूप वाढत चालले आहे. मित्रांनो ट्यूमर पासून सुद्धा बचाव करणारी अशी ही चिंचेची पाने आहेत. मित्रांनो इतके सर्व फायदे जर या वनस्पतीचे असतील तर मग चिंचेची कोवळी पाने खाण्यास काय हरकत आहे. तुमच्या भागात सुद्धा ही वनस्पती नक्की असेल त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही या वनस्पतीचे पान आवश्यक खा.