मराठा आरक्षणासाठी युक्तिवाद करु नये असं फडणवीसांनीच सांगितलं होतं- महाधिवक्ता कुंभकोणी

0
165

मुंबई:- फडणवीस सरकारने दिलेल्या मराठा आरक्षणास आता सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळाली आहे. आता आरक्षण टिकवण्यासाठी ठाकरे सरकार कसरत करणार आहे. याला आता एक धक्कादायक वळण लागलेलं आहे कारण महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी मराठा आरक्षणासाठी युक्तिवाद करु नये अस माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते,असं वक्तव्य केलं आहे.मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायलयाने तुर्तास स्थगिती दिली आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर भाजपने सडकून टीका केली आहे. पण, फडणवीस सरकारनेच युक्तिवाद न करण्यास सांगितल्याचा गौप्यस्फोट महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी केला आहे.दैनिक महाराष्ट्र टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 2019 मध्ये मराठा आरक्षणाचा खटला सुरू होता. तेव्हा सरकारनं सांगितल्यामुळेच आपण मराठा आरक्षणाच्या प्रकरणात न्यायालयात युक्तिवाद केला नाही,’ असा खुलासा कुंभकोणींनी केला आहे.मराठा आरक्षणावरून माजी सरकारी वकील निशांत कटनेश्वरकर यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता. यात त्यांनी आशुतोश कुंभकोणी हे एकदाही मराठा आरक्षणाच्या प्रकरणावर युक्तिवाद करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात आले नव्हते. खरंतर हे त्यांचे कर्तृव्य होते.पण, आज मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली आहे, त्याला कुंभकोणीही जबाबदार आहे, असा दावा कटनेश्वरकर यांनी केला होता.दरम्यान, मराठा आरक्षण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम आदेश दिला आहे. त्यानुसार वर्ष 2020-21 साठी मराठा आरक्षण स्थगित करण्यात आलं आहे.पदव्युत्तर आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाली. त्यामुळे यावर निर्णय घेता येणार नाही, पण वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमामध्ये मराठा आरक्षणाचा लाभ देता येणार नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केले. मराठा आरक्षणप्रकरणी आता घटनात्मक खंडपीठ पुढची सुनावणी करणार आहे. त्यामुळे आता पुढची सुनावणी होईपर्यंत राज्य सरकारच्या नोकर भरतीमध्ये मराठा समजाला आरक्षणाचा लाभ मिळणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here