गवारची भाजी खाण्याचे आरोग्यदायी फायदे

0
324

गवारची भाजी आरोग्यासाठी फार गुणकारी आहे. गवारच्या भाजीमध्ये फायबर, प्रोटीन, कार्बोहाइड्रेट्स , क, अ, जीवनसत्त्वे, फॉस्फरस, कॅल्शियम, लोह आणि पोटॅशियम हे पोषक घटक आढळून येते. गवारच्या भाजीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळे गवारची भाजी आठवड्यातून एकदा तरी नक्की खावी. भारताच्या सर्व भागात गवारची भाजी आढळते. आज आपण गवारची भाजी खाल्याने कोणते फायदे होतात हे पाहणार आहोत.हाडांशी संबंधित कोणताही आजार असेल तर गवारच्या भाजीचे सेवन करणे फायद्याचे ठरते. या भाजीमध्ये कॅल्शियम, लोह, पोटॅशियम हे घटक असतात. आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी हे घटक फायदेशीर असतात. त्यामुळे तुम्ही हाडांच्या मजबुतीसाठी गवाराची भाजी खाऊ शकता.गवारच्या भाजीमध्ये ग्लायको न्युट्रिएन्ट्स असतात. मधुमेहाचा त्रास असलेल्या रुग्णांनी गवारची भाजी खाणे फायद्याचे आहे. डायबिटीजच्या रुग्णांनी कच्ची गवार खाल्ल्यास फायदा होतो.गवारीची भाजी गर्भवती महिलांसाठीही लाभदायक असते. आयर्न आणि कॅल्शिअमची कमतरता पूर्ण करण्यासाठी गर्भवती महिलांना गवार खाण्याचा सल्ला दिला जातो. याबरोबरच गवारीमध्ये असणारे फॉलिक ऍसिड आणि व्हिटॅमिन्स पोटातील बाळाच्या विकासासाठी फायदेशीर असतात.आपल्या दैनंदिन आहारामध्ये गवारच्या भाजीचा समावेश करणे चांगले आहे. हृदय-निरोगी अन्न म्हणून गवारची भाजी कार्य करते. रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी ही भाजी फायदेशीर ठरते. हृदयाशी संबंधित रोगांचे संरक्षण करते.गवारीच्या भाजीमध्ये आढळून येणारे कॅल्शियम, लोह हे घटक हाडांच्या मजबुतीसाठी सहायक असतात. आपल्याला हाडांशी निगडीत समस्या असतील तर गवारीच्या भाजीचा आपल्या आहारात समावेश जरूर करावा.गवारीच्या भाजीमधील हायपोग्लायसेमिक आणि हायपोलिपिडेमिक गुणधर्मामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो. दमा असलेल्या रुग्णांसाठी ही भाजी अत्यंत फायदेशीर आहे. गवारीला पाण्यामध्ये उकळून हा रस दमा असलेल्या रुग्णाला दिल्यास दम्याची समस्या कमी होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here