जामनेर ;- ओ.बी.सी.साठी असलेली क्रिमिलियर मर्यादा हटवणे बाबत जामनेर तहसिलदार यांना राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल तर्फे निवेदन देण्यात आले याबाबत सविस्तर वृत्त असे की
ओ.बी.सी.मागास वर्गीय ओबीसी एकूण 27टक्के क्रिमिलियर मर्यादा केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या असून सदर मर्यादा ही वार्षिक उत्पन्न जास्त असणाऱ्या लोकांना अडचणीची ठरत असुन यामुळे ओबीसींच्या संबंधित वर्गाला अडचणी निर्माण होतात म्हणून सरसकट ओबीसींना क्रिमिलियर मर्यादा हटवून सर्वांना ओबीसीच्या विविध योजनांच्या सवलती मिळविण्यासाठी ओबीसीच्या कुठल्याही घटक वंचित राहू नये यासाठी केंद्र शासनाने तात्काळ क्रिमिलियर मर्यादा हटवावी.केंद्रातील भाजप सरकार सत्तेत आल्यापासून सातत्याने ओबीच वर अन्याय करीत आलेले आहे.या ओबीसी विरोधी सरकारने शिष्यवृत्तीतही अन्याय केला आहे. तरी वरील मागणी त्वरित मान्य करावी असे निवेदन आज दि.२४ सप्टेंबर ला तहसीलदार यांना जामनेर तहसील कार्यालय या ठिकाणी संजयदादा गरुड व उमेश नेमाडे जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस **ओबीसी सेल* च्या*वतीने निवेदन देण्यात आले
या वेळी अॅड.ज्ञानेश्वर बोरसे जिल्हा अध्यक्ष. लिगल सेल.
विलास राजपूत जिल्हा उपाध्यक्ष.
किशोर पाटील विधानसभा क्षेत्र प्रमुख. किशोर(प्रभू)झाल्टे ओबीसी शहरअध्यक्ष.
राजू नाईक तालुकाध्यक्ष ओबीसी सेल.
प्रल्हाद बोरसे,संदीप हिवाळे
पप्पू पाटील शहरअध्यक्ष.
विनोद माळी युवक शहराध्यक्ष.
मोहन चौधरी ओबीसी शहरउपाध्यक्ष.
दिपक रेशवाल.शशिकांत झाल्टे.राहुल झाल्टे आदी. कार्येकर्ते उपस्थित होते.
Home राज्य उत्तर महाराष्ट्र ओ.बी.सी.साठी असलेली क्रिमिलियर मर्यादा हटवा ; जामनेर तहसिलदार यांना राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी...