दररोज 1 वाटी भिजवलेला हरभरा खा, होतील हे आश्चर्यकारक फायदे…

0
166

तुम्ही पाहीलं असेल की घरातील वयस्कर लोक सकाळी उठल्यानंतर नाष्त्यासाठी भिजवलेले चणे खातात. तर काहीजण जीमवरून आल्यानंतर भिजवलेले चणे खातात. पण तुम्हाला माहीत आहे का रोज भिजवलेले चणे खाण्याचे काय फायदे आहेत. अनेक पोषक घटक आणि विटामीन्स आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणात भिजवलेल्या चण्यांमध्ये असतात. हे चणे आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात.

वेगवेगळ्याप्रकारे शरीराला फायदे मिळवून देण्यासाठी चण्यांचा आहारात समावेश करणं गरजेचं आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहेत चणे खाण्याचे फायदेे. भिजवलेल्या हरब-यामध्ये प्रोटीन, फायबर, मिनरल आणि व्हिटॅमिन भरपूर असते. जे अनेक आजारांपासून दूर ठेवण्यात मदत करते आणि आपल्याला हेल्दी ठेवते. एम्स नवी दिल्लीच्या डायटीशियन रेखा पाल शाह सांगतात की, प्रत्येक व्यक्तीने हरबरे खाणे चांगले राहते परंतु विशेषतः पुरुषांनी भिजवलेले हरबरे अवश्य खावेत.

हरभरा वनस्पतीचे सर्व भाग उपयुक्त असून बियात प्रथिने व कार्बोहायड्रेटस् तसेच जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात. जेवणामध्ये हरभ-याचा कोवळा पाला, पीठ व डाळ याचा भरपूर उपयोग करतात. हरभ-याच्या कोवळ्या शेंड्याचा (पानांचा) उपयोग भाजीसाठी करतात.   फुले येण्याच्या सुमारास हरभ-याच्या पानावर एक प्रकारचे आम्ल तयार होते. पहाटे त्याच्यावर पातळ कापड दीड ते दोन तास पसरून ठेवले की ते दवाने ओले होते व पानावरील आम्ल त्यात उतरते. कापड पिळून आम्ल बाटलीत गोळा करतात त्यापासून उत्तम आम किंवा खारी तयार करता येते.

रोगप्रतिकार क्षमता वाढण्यास उपयुक्त: दररोज भिजलेल्या हरभरे खाल्ल्याने आपल्या शरीरातील रोग प्रतिकार क्षमता वाढण्यास मदत होते. त्यामुळे सतत होणाऱ्या आजारापासून आपली सुटका होते.,ऊर्जेचा चांगला स्त्रोत: नियमित सकाळी भिजलेले हरभरे खाल्ल्याने आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. याचे दररोज सेवन केल्याने शारिरीक दुर्बलता कमी होते.

डाळीचे पीठ त्वचेला लावल्यास डाग जाऊन त्वचा गोरी व कांतीमान होते. इसब, सांसर्गिक त्वचारोग, खरूज यावर हे पीठ उपकारक असते. मुरमेही जातात. यासाठी पीठ दह्यात भिजवावे व त्याचा लेप चेह-यावर देऊन थोडा वेळ ठेवावा तसेच चण्याच्या पिठाने केस धुतल्यास ते मऊ व स्वच्छ होऊन केसाचे रोग होत नाहीत. अंगाला घाम जास्त येत असल्यास, त्याला दुर्गंधी येत असल्यास स्नानाच्या वेळी अंगाला हरभरा डाळीचे पीठ लावल्यास स्वेद प्रवृत्ती व स्वेद दुर्गंधी कमी होते तसेच हरभ-याच्या पानांचा रस आठ चमचे व शहाळ्याचे पाणी हे मिश्रण रोज सकाळी रिकाम्यापोटी पाजल्यास लहान मुलांमध्ये जंतामुळे होणा-या उलट्या कमी होतात.

चणे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर असतात. कारण त्यात β-कैरोटीन तत्व असतात. डोळ्यांच्या नसांना नुकसान पोहोचवण्यापासून वाचवत असतात. त्यामुळे नजर चांगली होते. इतकंच नाही तर गरोदर महिलांसाठी सुद्धा चण्यांचं सेवन उर्जा देण्यासाठी लाभदायक ठरत असतं.निरोगी त्वचा राहते, वजन वाढण्यास मदत मिळेल, सर्दी खोकल्यापासून रक्षण होते, किडनीचा त्रास नाहीसा होतो तसेच हार्ट निरोगी राहत. भिजलेले चणे खाल्ल्याने साखर नियंत्रणात राहते. रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत मिळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here