सोयगाव तालुक्यात वीज कोसळून एक बैल,तीन शेळ्या ठार…जंगला शिवारातील घटना………

0
193

सोयगाव तालुक्यात वीज कोसळून एक बैल,तीन शेळ्या ठार…जंगला शिवारातील घटना………

सोयगाव दि.१७(प्रतिनिधीदिलीप शिंदे) सोयगाव तालुक्यात अचानक वीज कोसळून शेतात चरत असलेल्या तीन शेळ्या व एक बैल ठार झाल्याची खळबळजनक घटना शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली आहे.या घटनेत मात्र जवळच असलेला जनावरे चारणारा शेतकरी बालंबाल बचावला असून दैव बलवत्तर या म्हणीचा प्रत्यय या घटनेतून आला आहे.या प्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत घटनेचा पंचनामा झाला नव्हता.

जंगला शिवारात गट क्रमांक-१६३ मध्ये शेतकरी हिरा मंगू राठोड(रा.फर्दापूर तांडा वय ४५) हे शेतात बैल व शेळ्या चारत असतांना अचानक जंगला शिवारात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती,या पावसात अचानक वीज कोसळून या विजेच्या तडाख्यात एक बैल आणि तीन शेळ्या जागेवरच ठार होवून शेतकरी हिरा राठोड मात्र या धक्क्यातून दूरवर फेकल्या गेल्याने बालंबाल बचावला आहे.या घटनेत शेतकरी हिरा राठोड यांचे एक लाख रु.चे नुकसान झाले असून अद्यापही तालुका प्रशासनाकडून घटनेचा पंचनामा करण्यात आला नव्हता.

प्रतिक्रिया——राहुलराठोड—  जंगला शिवारात वीज कोसळून अल्पभूधारक शेतकऱ्याचे चार जनावरे ठार झाल्याच्या घटनेची माहिती तालुका प्रशासनाला देवूनही अद्यापही घटनास्थळी कोणीच आलेले नसल्याने फर्दापूर तांडा शिवारात प्रशासना विरुद्ध संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.संकटाच्या काळात प्रशासन धावून येत नसेल तर शेतकऱ्यांनी कसे जगावे

राहुल राठोड

फर्दापूर तांडा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here