छायाचित्र :- फिरोज पठाण याच्या मुलीच्या नावे फिक्स डिपॉझिट ची पावती देतांना सहायक पोलीस निरीक्षक प्रतापसिंग बहुरे व बुशरा पठाण
सोयगाव,दि.१८ (प्रतिनिधी )सोयगाव येथील गृहरक्षक दलातील फिरोज पठाण यांचं नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.त्याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत म्हणून फर्दापूर पोलीस ठाण्याच्या वतीने मयत फिरोज पठाण यांच्या मुलीच्या नावे बँकेत (बँक ऑफ महाराष्ट्र) पस्तीस हजार रुपये फिक्स डिपॉजिट करण्यात आले.डिपॉजिटची पावती (दि.१७ )शनिवार रोजी पोलीसांनी मयत फिरोज पठाण यांचे वडील शेरखाॅ पठाण व मुलगी बुशरा पठाण यांना सहा.पोलीस निरीक्षक प्रतापसिंग बहुरे यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी पोलीस कर्मचारी अण्णा गवळी,चालक मिर्झा, गृहरक्षक दलाचे योगेश बोखारे, विशाल घन, शेख सुलेमान आदी उपस्थित होते.
छायाचित्र :- फिरोज पठाण याच्या मुलीच्या नावे फिक्स डिपॉझिट ची पावती देतांना सहायक पोलीस निरीक्षक प्रतापसिंग बहुरे व बुशरा पठाण