राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला `हनी ट्रॅप`मध्ये अडकविण्याचा प्रयत्न : पोलिसांकडे केली तक्रार ,या प्रकाराचा खरा सूत्रधार कोण? तरुण तडफदार युवा नेत्यांचे राजकीय जीवन बदनामीतुन उध्वस्त करण्याचा होता डाव ..!

0
290

जळगाव : जळगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील याना हनी टॅप मध्ये अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला.याबाबत त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

अभिषेक पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, सन २०१९ ची विधानसभा मी राष्ट्रवादी काँग्रेस कडून लढलो. जनतेने आपल्याला चांगले मतदान केले. मात्र आपण पराभूत झालो. त्यानंतर आपण पक्षाचा जळगाव शहर माहानगर अध्यक्ष म्हणून काम करीत आहे. १५ ऑक्टोंबर रोजी आपण मुंबई येथून येत असताना एका महिलेचा आपणास फोन आला. त्या महिलेने आपली भेट घ्यावयाची असल्याचे सांगितले. आपण त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात १६ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजता येण्यास सांगितले. सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय बंद असल्याचे त्यांनीच मला सांगीतले. त्यानंतर त्यांना आपण रिंग रोड येथील आपल्या कार्यालयात येण्यास सांगितले. त्यानुसार ती महिला आपणास भेटावयास आली. मात्र त्यांनी जे सांगितले त्यामुळे आपल्याला धक्का बसला.

तिने सांगितले की मी मोठ्या लोकांना मुली पुरवते. मला एका व्यक्तीने अगाऊ रक्कम देऊन मुलीसोबत तुमचे अश्लिल फोटो, व्हिडिओ काढून बलात्काराचे आरोप करून तुमचे राजकीय जीवन संपविण्याच सांगितले आहे. त्या महिलेने संबधित व्यक्तीचे व्हॉट्स अपमध्ये संबंधित व्यक्तीने माझे पाठविलेले फोटो ही दाखविले. या महिलेच्या मागे कोणीतरी मोठी राजकीय व्यक्ती असून त्याचा पोलिसांनी तपास करावा अशी मागणीही केली असल्याचे अभिषेक पाटील यांनी सांगितले.

अभिषेक पाटील म्हणाले की, एका भाजपा नगरसेवकाने अभिषेक चांगला माणूस आहे. त्याच्याबाबत असे करू नको, असेही तिला सांगितले, त्यामुळे हा मोठा राजकीय कट माझ्याविरुद्ध रचला गेले असल्याचे दिसत असून याबाबत पोलीस तपासात भविष्यात सर्व सत्य समोर येईल असेही आभिषेक पाटील म्हणाले. दरम्यान रामानंदनगर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी संबंधित महिलेचा व माझा जवाब लिहून घेतले असल्याचे देखील अभिषेक पाटील म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here