शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५०,००० रु. मदत द्या – संभाजी ब्रिगेडची मुख्यमंञ्यांकडे मागणी

0
267

*बळीराजाच्या मागण्या पूर्ण करा संभाजी ब्रिगेडचे मुख्यमंत्री यांना निवेदन*

मोताळाप्रतिनिधी- गणेश शिंदे ]                            संभाजी ब्रिगेड मोताळा तालुका तर्फे तहसीदार मोताळा यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
अतिवृष्टीमुळे सर्व शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे सरसकट अतिवृष्टी मदत हेक्‍टरी 50,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करावी तसेच पिक विमा शेतकऱ्यांना तात्काळ देण्याचे आदेश संबंधित विमा कंपन्यांना देऊन शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ पैसे जमा होतील याकडे लक्ष द्यावे मागील सहा महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भावामुळे शेतमालाला बाजार भाव मिळाला नाही. यामुळे शेतकऱ्याची हाल झाले या हंगामात पीक चांगले आले होते परंतु अतिवृष्टीमुळे सर्व पिकाचे भयानक नुकसान झाले या चहूबाजूने आलेल्या संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे त्यामुळे शासनाने पंचनामे करत वेळ वाया न घालवता तात्काळ सरसकट 50,000 रुपये मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा अन्यथा अन्यथा संभाजी ब्रिगेड तर्फे संपुर्ण महाराष्टात आंदोलन करण्यात येईल अश्या प्रकारचे निवेदन देण्यात आले यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल देशमुख,तालुका अध्यक्ष गणेश शिंदे पाटील’रामभाऊ शिंदे रघुनाथ संभाजी गवळी व कार्यकर्ते हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here