खडसें शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार : जयंत पाटील

0
236

मुंबई (वृत्तसंस्था) भाजपचे नाराज नेते एकनाथराव खडसे येत्या शुक्रवारी दुपारी दोन वाजता राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.भाजपचे नाराज नेते एकनाथराव खडसे येत्या शुक्रवारी दुपारी दोन वाजता शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यांनी भाजपचा राजीनामा देऊन सर्व पदे सोडली आहेत. एकनाथराव खडसे यांनी आज सकाळी पक्षाचा राजीनामा दिला अशी माहिती मिळाली. त्यामुळे त्यांना राष्ट्रवादीत घेण्यात कोणतीही अडचण नाही, असंही जयंत पाटील म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येताना त्यांनी कोणतीही अट ठेवली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्त्वात काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली, असंही पाटील यांनी नमूद केलं.दरम्यान, काही दिवसांपूर्वीच खडसे यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली होती. परंतू त्यावेळी खडसे यांनी राजीनाम्याचे वृत्त फेटाळून लावले होते. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खडसे यांच्या पक्षप्रवेशाबाबत आता अधिकृत घोषणा केली आहे. खडसे समर्थक भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे त्यांच्या बंगल्यावर जमा झाले आहेत. तर खडसे यांच्या समर्थकांना गुरुवारी मुंबईत जमण्याच्या सूचना देण्यात आल्याचे वृत्त मंगळवारी समोर आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here