जामनेर तालुक्यात राजकीय हालचालींना वेग ,भाजपातील खडसे समर्थक राष्ट्रवादीत प्रवेशाला सुरुवात, एकनाथ खडसें गिरीश महाजन यांना दुसरा धक्का देण्याचा तयारीत…

1
173

जामनेर तालुक्यात राजकीय  हालचालींना वेग भाजपातील खडसे समर्थक राष्ट्रवादीत प्रवेशाला सुरुवात झाली असुन तळेगाव -शेळगाव येथील ४००ते ५०० कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल होणार अशी सुञांकडुन माहिती मिळत आहे.असे झाल्यास आ.महाजन यांना बसनार मोठा फटका

तळेगाव (ता.जामनेर) ता.६ भारतीय जनता पक्षाचे मा. मंत्री व खानदेशाची बुलंद तोफ मा.महसुलमंत्री एकनाथराव खडसे यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस मा.मंत्री गिरीष महाजन यांच्या ञासाला कंटाळुन ४० वर्षाची पक्षाची सेवा भावी सेवा करुन भाजपला रामराम ठोकला आणि राष्ट्रवादी पक्षात शरदचंद्रजी पवार  यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.आणि खडसे समर्थकांमध्ये एक आंनदाचे उत्साहाचे वातावरण तयार झाले. नुकतेच देवपिंपी व नेरी येथील २०० भाजप कार्यकर्तेनी मुक्ताईनगरला जाऊन एकनाथराव खडसे व रोहिणीताई खडसे याच्या उपस्थित प्रवेश केला. असुन तळेगाव -शेळगाव महाजनांचा बालेकिल्ला येथे  ८० ते ९०% भाजप मतदार मात्र खडसे समर्थक ४०० ते ५०० नवयुवक तरुण कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार आसल्याची चर्चेला ऊत आला आहे. लवकर तळेगाव -शेळगाव येथे मा. मंत्री एकनाथराव खडसे यांचे जंगी स्वागताचा  कार्यक्रम आयोजित करुन राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये भाजप समर्थक प्रवेश सोहळा आयोजित करण्यात येत आहे. मा.मंत्री गिरीष महाजन यांनी खडसे समर्थकांना गेल्या वीस वर्षपासुन डावलण्याचेच काम करीत आल्याने महाजन आता यांची किंमत मोजावी लागेल आणि येणाऱ्या विधान संभा निवडणूकीत हार मानावी लागेल तळेगाव -शेळगावसह सर्व जामनेर तालुक्यात चौका चौकात मा.महसुलमंत्री एकनाथराव खडसे आणि मा.मंत्री गिरीष महाजन यांच्याच विषयी सर्वत्र चर्चा रंगत असुन राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मात्र जामनेर तालुक्यात वाढेल यांची शक्यता नाकारता येत नाही.

1 COMMENT

  1. मोठा धक्का निवडणूक मध्ये देणार 50 % जनतेचा निर्णय खाऊन पिऊन घ्या भाजप ला मतदान करू नका हा फार्मुला 25 वर्षांपूर्वी वापरला गेला होता तोच आता वापरणार कोणत्याही प्रकारचे विकास काम नाहीत फक्त दारु देऊन तरूण पिढी बिघडवली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here