रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण

0
37

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांच्या कन्या व जळगाव जिल्हा बँकेच्या चेअरमन अॅड. रोहिणी खडसे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.                       जळगाव : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांच्या कन्या व जळगाव जिल्हा बँकेच्या चेअरमन अॅड. रोहिणी खडसे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना जळगाव येथील रूग्णालयात उपचारार्थ दाखल झाल्या आहेत. याबाबत त्यांनीच ट्वीट करून माहिती दिली आहे.

माजी मत्री व भाजप नेते एकनाथराव खडसे व त्यांच्या कन्या अॅड. रोहीणी खडसे यांनी गेल्याच आठवड्यात मुंबई येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.या प्रवेशानंतर खडसे यांची जिलह्यात राजकीय बैंठकासाठी उपस्थिती होती., मात्र त्यांनी आपली तपासणी केली असता त्याचा कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आला आहे.

अॅड. रोहिणी खहसे यांनी याबाबत टि्वटव्दारे माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे कि माझी कोरोना चाचणी पॅाझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती उत्तम आहे. मात्र सावधानता म्हणून मी रूग्णालयात दाखल होत आहे.

माझी कोरोनाची चाचणी positive आली असून प्रकृती उत्तम आहे सावधता म्हणुन रुग्णालयात दाखल होत आहे.

— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) November 15, 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here