जामनेरात महान चक्रवर्ती सम्राट बळीराजा पुजनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

0
156

जामनेर[प्रतिनिधी ] जामनेर शहरात सालाबादाप्रमाणे  यावर्षी ही मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड जामनेर तालुका तर्फे महान चक्रवर्ती सम्राट बळीराजा पुजनाचा कार्यक्रम आज बलिप्रतिपदेच्या निमित्ताने राजमाता जिजाऊ चौकात मोठ्या ऊत्साहात संपन्न झाला. यावेळी बळी – हिरण्यकशिपुचा पणतू, प्रल्हादाचा नातु , विरोचन याचा पुत्र, कपिलचा पुतण्या आणि बाणाचा पिता. भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील एक अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्व सुमारे साडेतीन ते पाच हजार वर्षांपूर्वी होऊन गेलेला भारतीय बहुजन समाजाचा एक महानायक, एक महान सम्राट, एक महान तत्ववेत्ता, जगद्गुरू संत तुकोबारायांनी
“बळी सर्वस्वे उदार l
जेणे उभारिला कर l
करुनि काहार l
तो पाताळी घातला ll ”
असं ज्या बळीराजाचं वर्णन केले आहे. त्या बळीराजाला आठवण्याचा आजचा दिवस म्हणजेच “बलिप्रतिपदा” !
याच दिवसाला “दिवाळी पाडवा” असे म्हणतात.
याच दिवशी बहीण भावाला ओवाळतांना,
” इडा पिडा टळो l आणि
बळीचे राज्य येवो !!”
अशी साद घालते. बलिप्रतिपदेच्या तसेच बळी महोत्सवाच्या तमाम भारतीयांना कृषकांना, कष्टकरी, शेतकऱ्यांना कोटी कोटी शुभेच्छा….अशा शुभेच्छा मान्यवरांनी दिल्या यावेळी आमदार गिरीष महाजन , पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष योगेश पाटील एकुलती , अमोल पाटील ,प्रदिप गायके, मनोजकुमार महाले ,डाँ.प्रशांत भोंडे, माधव चव्हाण ,किशोर पाटील,जितेंद्र रमेश पाटील ,विनोद पाटील , एस.टी.पाटीलसर,सुनिल कानळजे,दिलीप पाटील,सुरेश पाटील, सुनिल तुकाराम पाटील,बंडू पांढरे , समाधान वाघ , अनिल गायकवाड ,विलास राजपुत, जितेश ऊर्फ पप्पू पाटील,प्रल्हाद बोरसे,ऊल्हास पाटील,डाँ.बाजीराव पाटील,भुषण पांढरे ,संदीप हिवाळे ,बंटी वाघ, विशाल पाटील, प्रदिप सोनवणे,भगवान शिंदे, दशरथ पाटील,सदाशिव माळी,अरुण जाधव , असे असंख्य कार्यकर्ते  उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here