जामनेरात जुगार अड्डयांवर छापा, साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त, सहा जणांना अटक, नाशिक परीक्षेञाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डाँ.प्रतापराव दिघावकर यांनी नेमणूक केलेल्या पथकाची धडक कारवाई

0
306

जामनेर  [प्रतिनिधी ] जामनेर शहरातील पाचोरा रोड वरील महाराष्ट्र ढाब्याचे पाठीमागे ज्योतीबाबा बंद पेट्रोल पंपाच्या बाजुला असलेल्या कपाशीच्या शेतात लिंबाच्या झाडाखाली बसुन झन्ना मन्ना जुगाराचा खेळ खेळतांना जुगाराच्या अड्डयांवर छापा टाकण्यात आला त्यावेळी ६ जणांना ताब्यात घेण्यात आले .१) विशाल प्रताप वाघ रा.बजरंगपुरा जामनेर २) अरुण चांगो नरवाळे रा.टाकळी ता.जामनेर ३)राहुल राजु माळी रा.गणेशवाडी जामनेर ४) दिपक पंढरी भोई रा.गणेशवाडी जामनेर ५) सुमेध अरुण जाधव रा.सुतारगल्ली जामनेर ६) दिलीप विजय माळी रा.माळी गल्ली जामनेर या लोकांना जुगार खेळतांना ताब्यात घेतले असता त्यांच्या कडून ४१,३७०/-रुपये रोख ३६५०/- रुपयांचे जुगाराचे साहित्य ,व इतर वस्तु तसेच ३,००,०००/- रुपये किंमतीच्या मोटारसायकली असा एकुण ३,४५०२०/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर बाबत जामनेर पोलीस स्टेशनला महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ)सह भा.दं.वि. कलम १८८,२६८,२६९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर कारवाई ही नाशिक परीक्षेञाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डाँ.प्रतापराव दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय.संदीप पाटील, एएसआय राजेंद्र सोनवणे,पो.ना.नितीन सपकाळ,पो.काँ.उमाकांत खापरे, विश्वेश हजारे,दिपक ठाकुर ,केतन पाटील या विशेष पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here