विद्यार्थ्यांनी स्वच्छतेबरोबर कोरोनाचे नियम पाळणे गरजेचे :- जामनेर पं.स.गटविकास अधिकारी ज्योतीताई कवडदेवी यांचे प्रतिपादन.

0
65

जामनेर [ प्रतिनिधी] विद्यार्थ्यांना   स्वच्छतेबरोबर कोरोनाचे नियम पाळणे गरजेचे आहे असे प्रतिपादन जामनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्रीमती ज्योतीताई कवडदेवी यांनी केले. जामनेर तालुक्यातील टाकरखेडा जि.प मराठी शाळेत आज दिनांक २३/११/२०२० रोजी शा.पो.आ अंतर्गत धान्यादी मालाचे वाटप करतांना त्यांनी विदयार्थांसमोर बोलतांना सांगितले की, विदयार्थ्यांनी दररोज नियमितपणे हात साबणाने स्वच्छ धुतले पाहिजे.तोंडाला मास्क लावले पाहिजे तसेच सोशल डिस्टींसिंगचे पालन केले पाहिजे तरच आपण कोरोनावर मात करू शकतो. अॉनलाइन व अॉफलाईन शिक्षण बाबत विद्यार्थ्यांनी मनापासून अभ्यास करावा. गावातील पालकांचे तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे सहकार्य आणी शिक्षकांवर असलेल्या विश्वासामुळे टाकरखेडा शाळेची शैक्षणिक गुणवत्ता वाढत आहे म्हणून बाहेर गावचे विद्यार्थी हे गावातील शाळेत दाखल होत आहेत हे सारे श्रेय मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षकांचे आहे. विद्यार्थ्यांनी जिद्दीने तसेच सकारात्मक विचार ठेवून नियमितपणे अभ्यास केला तरच आपण उच्च पदावर पोहचू शकतो.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समाधान पुंडलिक पाटील हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून जामनेर पं. स. चे गटविकास अधिकारी श्रीमती ज्योतीताई कवडदेवी, गटशिक्षणाधिकारी पं.स.जामनेर विजय सरोदे, पोलीस पाटील समाधान मुरलीधर पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य शिवाजी डोंगरे, नानाभाऊ सुरळकर उपस्थित होते. माहे सप्टेंबर ते नोव्हेंबर २०२० पर्यंत ५६ दिवसांचा विद्यार्थ्यांना शा.पो.आ अंतर्गत तांदूळ, मटकी, मसुरदाळ धान्यादी मालाचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी पं.स.जामनेर विजय सरोदे यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना शालेय बाबतीत मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांनी प्रास्ताविकात शाळेचे शैक्षणिक उपक्रम तसेच अॉनलाइन व अॉफलाईन शिक्षण बाबत सविस्तर माहिती उपस्थितांना सांगितली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील मुख्याध्यापक पी.टी.पाटील, शिक्षक देवाजी पाटील, रवींद्र चौधरी, जयंत शेळके, विकास वराडे, जयश्री पाटील, छाया पारधे यांनी तसेच शा.पो.आहार स्वयंपाकी व मदतनीस लता तायडे, आशा कोळी यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here