जामनेर येथील न्यू इंग्लिश स्कुलच्या प्रभारी मुख्याध्यापिकेस उच्च न्यायालयाचा दणका

0
193

जामनेर;-  येथील न्यू इंग्लिश स्कुल येथे उपशिक्षिका श्रीमती नलिनी उत्तमसिंग पाटील या २०१२ पासून कार्यरत असून त्यांची २०१५ मध्ये व्यवस्थापनाने विनाअनुदानित तत्वावरून अनुदानित तत्वावर बदली केली होती. तथापि या बदलीस तत्कालीन उपशिक्षणाधिकारी (माध्य) यांनी मान्यता नाकारल्याने श्रीमती नलिनी पाटील यांनी गेल्या ५ वर्षांत दोनदा उच्च न्यायालयात याचिका दाखल करून लढा दिला.दुसऱ्या याचिकेच्या अंतिम सुनावणी वेळी दि ४/३/२०२० रोजी न्यायालयाने श्रीमती नलिनी पाटील यांचा पगार ४ आठवड्यात अदा करण्याचे स्पष्ट निर्देश मुख्याध्यापक , न्यू इंग्लिश स्कुल आणि शिक्षणाधिकारी ( माध्य) ,जि प , जळगाव यांना दिलेले होते.

तथापि न्यायालयाने दिलेली ४ आठवड्यांची मुदत संपून सुद्धा तत्कालीन प्रभारी मुख्याध्यापक *श्री बी आर चौधरी*, आणि *विद्यमान प्रभारी मुख्याध्यापिका श्रीमती प्रतिभा नसिकेत नरवाडे* यांनी उपशिक्षिका श्रीमती नलिनी पाटील यांचा पगार अदा करण्यासंदर्भात कुठलीही कार्यवाही केली नाही.शिक्षणाधिकारी ( माध्य ) जि प , जळगाव यांनी सदर दोन्ही संबंधित मुख्याध्यापकांना न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे म्हणून वेळोवेळी स्मरणपत्रे दिली परंतु श्री बी आर चौधरी आणि श्रीमती प्रतिभा नरवाडे यांनी त्यांचे आदेश धुडकावून लावले.

त्यामुळे ३-४ महिने प्रतीक्षा करून नाईलाजाने श्रीमती नलिनी पाटील यांनी जुलै २०२० मध्ये उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अवमानना याचिका दाखल केली. सदर याचिकेत माजी मुख्याध्यापक श्री बी आर चौधरी , आणि विद्यमान मुख्याध्यापिका श्रीमती प्रतिभा नरवाडे आणि शिक्षणाधिकारी ( माध्य) , जि प जळगाव यांचेवर सुनावणी चालू आहे.तथापि न्यायालयाने विद्यमान मुख्याध्यापिका प्रतिभा नरवाडे यांना न्यायालयात हजर होण्यासाठी वारंवार नोटीस बजावून सुद्धा त्या न्यायालयात हजर न झाल्याने *उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने त्यांना १०००० ₹ चा दंड ठोठावत जामीनपात्र वारंट जारी केला आहे.*

निवृत्त मुख्याध्यापक बी आर चौधरी व सदर मुख्याध्यापिका श्रीमती प्रतिभा नसिकेत नरवाडे यांचेवर आधीच रद्दी अपहार प्रकरणी गुन्हा दाखल असून जामनेर न्यायालयात त्याबद्दलच्या केसचे कामकाज चालू असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here