जळगाव शहरात वीजचोरी विरोधात महावितरणची धडक मोहीम ; रामनगर मेहरून परिसरात अभियंता सुरेश पाचंगे व पथकाने 100 वर वीज जोडण्यांची केली तपासणी

0
52

*रामनगर मेहरून परिसरात वीज चोरी विरुद्ध धडक मोहीम अभियंता सुरेश पाचंगे व पथकाने तपासले 100 वर वीज जोडण्या*
जळगाव  (प्रतिनिधी) काल 31-12-20 ला वीज वितरण कम्पणीचे तीन अधिकाऱ्यांचे पथकाने अचानक रामनगर परिसरात धडक मोहीम राबवत 100 वर घरगुती आणि व्यावसायिक जोडण्या तपासल्या असता त्यात 12 ते 15 ग्राहकांची वीज चोरी सापडली असून काही ग्राहकांनी रिमोट माध्यमाने केलेल्या चोऱ्या सुद्धा उघडकीस आल्या असून सर्वाना वीज चोरी अधिनियम 135 व 126 नुसार विजचोरी बाबत गुन्हा दाखल करण्याचे सूतोवाच अभियंता सुरेश पाचंगे यांनी केली असून सदर परिसरात यापूर्वीच महावितरणने ग्राहकांचे सोयीसाठी सुरळीत आणि अविरत वीजपुरवठा कामी एबी केबल चे पूर्ण नेटवर्क केले आहे तर 10 नवीन रोहित्र सुद्धा सुरू केलेत मात्र तरीही या परिसरातील ग्राहक हुक ऐवजी आता मीटर ला छेडछाड करून वीज चोरी करीत असल्याची खबर महावितरणला लागली त्या अनुषणगाने आज दिलीप दारवनटे महिंद्रा पवार,आरिफ अहम्मद,शेख मुस्तकीम,शेख मुस्तकींम पिंजारी शेख रशीद,शांताबाई गवळे, मो इकबाल,मो एजाज,जीवन किराणा,ज्ञानेशवर पाटील किराणा दिलीप राठोड व इतर वीज ग्राहकांवर धडक कार्यवाही करत त्यांचे मिटर तपासणीसाठी ताब्यात घेतले असून सदर पथक मा मुख्य अभियंता अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांचे मार्गदर्शनात व अति. कार्य. अभियंता धीरज बारापत्रे यांचे निदर्शनात अभियंता सुरेश पाचंगे,अभियंता उमेश घुगे,अभि.जयेश तिवारी सोबत तंत्रज्ञ सुरेखा डोळे,नितीन पाटील,निलेश भोसले सचिन,लोंढे यांचे सह राबविण्यात आले असून ही मोहीम पुढील काही दिवसात अधिक तीव्र करण्याचे संकेत कक्षप्रमुख सुरेश पाचंगे यांनी दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here