जामनेर / प्रतिनिधी
वंशिका प्रतिष्ठान भुसावळ यांचे तर्फे सावित्रीबाई फुले जयंती निमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या .या स्पर्धेत इंदिराबाई ललवाणी माध्यमिक विद्यालयातील इयत्ता सातवीची विद्यार्थिनी कु.प्रणाली विजय वाघ या विद्यार्थिनीने जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकाविला !
प्रणालीने मिळविलेल्या यशानिमित्त संस्थेचे आधारस्तंभ माजी खासदार ईश्वरलालाबाबूजी जैन ,माजी आमदार दत्तात्रयभाऊ महाजन ,संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र महाजन ,संस्थेचे सचिव किशोर महाजन ,उपाध्यक्ष विनित महाजन ,ज्येष्ठ संचालक श्रीराम महाजन ,संचालक व माजी प्राचार्य के.व्ही.महाजन ,तसेच सर्व संचालक मंडळ यांनी प्रणाली वाघ हिचे अभिनंदन केले ! तसेच मुख्याध्यापक एस.बी.भोई, उपमुख्याध्यापिका सौ .सुनंदा देवकर ,उपप्राचार्य जे .पी .पाटील हायस्कूलचे पर्यवेक्षक ए.जे. अग्रवाल , एस.आर.चव्हाण , एस.पी.मोरे ,कॉलेजचे पर्यवेक्षक प्रा.के.एन.मराठे,प्रा.आर.ए. पाटील व इतर सर्व शिक्षक बांधवांनी तिचे कौतुक केले .