मोठी बातमी, बाळासाहेब थोरातांनी दिला प्रदेशाध्यपदाचा राजीनामा?

0
37

थोरात यांच्याकडे महसूल मंत्री, काँग्रेस विधिमंडळ गट नेते तसच प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी आहे. त्यामुळे कदाचित थोरात प्रदेश अध्यक्षपद सोडण्याची शक्यता..

नवी दिल्ली, 04 जानेवारी : नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात काँग्रेसमध्ये (Congress) बदलाचे वारे वाहत आहे. राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasheb Thorat) हे प्रदेशाध्यक्षपदातून (State President) मुक्त होणार आहे. नवीन दिल्लीत पोहोचून थोरात यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा प्रस्ताव दिल्याची माहिती समोर आली आहे.

नवीन वर्षात काँग्रेसमध्ये अंतर्गत बदल होणार आहे. त्याचच एक भाग म्हणून बाळासाहेब थोरात हे आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहे. बाळासाहेब थोरात हे दिल्लीत पोहोचले आहे. राजीव सातव यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी संघटनेचे सचिव के.सी. वेणूगोपाल यांची भेट घेतली.

थोरात यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा प्रस्ताव मांडला आहे. के.सी. वेणूगोपाल हे आता थोरात यांचा प्रस्ताव लवकर सोनिया गांधी यांच्याकडे   पत्र देणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सोनिया गांधी यांनी जर बाळासाहेब थोरात यांचा प्रस्ताव स्वीकारला तर प्रदेशाध्यक्षपदासाठी निवडीची प्रक्रिया लवकर सुरू होईल.

थोरात यांच्याकडे महसूल मंत्री, काँग्रेस विधिमंडळ गट नेते तसच प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी आहे.  त्यामुळे कदाचित थोरात प्रदेश अध्यक्षपद सोडण्याची शक्यता असल्याचे  बोलले जात आहे.  दरम्यान, त्याआधी बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसचे नेते राजीव सातव यांची भेट घेतली आहे.  दोन्ही नेत्यांमध्ये बंददाराआड चर्चा झाली आहे. मात्र, चर्चेचा तपशील अद्याप बाहेर आली नाही.

विशेष म्हणजे, बाळासाहेब थोरात यांनी  मागील काही काळात रोखठोक भूमिका मांडल्यामुळे ते चर्चेच्या स्थानी होते. काँग्रेसच्या आमदारांना निधी असो अथवा मंत्रिमंडळात काम करण्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. एवढंच नाहीतर अलीकडे औरंगाबाद शहराच्या नामकरणालाही थोरात यांनी विरोध केला होता. त्यांच्या वक्तव्यामुळे महाविकासआघाडीमध्ये बिघाडीची चिन्ह निर्माण झाली होती.

प्रदेशाध्यक्षपदी तरुणी नवीन चेहऱ्याला संधी देण्याची काँग्रेसमध्ये चर्चा सुरू आहे. मुंबई शहरअध्यक्ष बदल्यानंतर प्रदेशाध्यक्षही बदलण्याबाबत हायकमांड काय निर्णय घेते हे पाहण्याचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here