महाराष्ट्रातील सर्व सरकारी दवाखान्यांची विभाग निहाय स्वतंत्र तपासणी झाली पाहिजे : संभाजी ब्रिगेड

0
22

पुणे : मंत्रालयात आग लागली किंवा लावली त्यावेळी सुद्धा महाराष्ट्र शासन हादरले होते… आणि राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील सगळ्या ठिकाणी फायर ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आलेत… प्रत्येक विभागाने लाखो रुपये खर्च केला. आज तेच फायर सिलेंडर धूळखात पडलेले आहेत. घटना घडली की तत्परता आठवते… मात्र नंतर त्यावर कायम कारवाई होताना दिसत नाही…

राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयाची अवस्था अत्यंत दयनीय आहे. ग्रामीण भागातून एखादी महिला डिलिव्हरीसाठी आली असेल किंवा एखादा सर्प दोषाचा पेशंट असेल तर त्याला ऍडमिट करून घेतले जात नाही तर उलट त्याला खाजगी हॉस्पिटल बसवले जाते. कारण तेच खाजगी हॉस्पिटल हे सरकारी दवाखान्यातील डॉक्टरचे असते. सगळे गोड बंगला असतो. सरकारी दवाखान्यात पुरेशी यंत्रणा दिली गेली पाहिजे आणि रुग्ण आणि नागरिकांच्या दृष्टीने पुरेशी काळजी घेतली पाहिजे. मात्र तशी काळजी घेतली जात नाही हे या राज्यातील सगळ्या सरकारी दवाखान्यातील खरं वास्तव आहे. भंडाऱ्यात दहा मुलं-मुली मृत्यूमुखी पडली अशीच दररोज प्रत्येक जिल्ह्यात बेपर्वाईने माणसं मरत असतात… फक्त ते समोर येत नाही किंवा त्याची Breking News होत नाही.

राज्यातील सरकारी रुग्णालयांची सिस्टीम सुधारली पाहिजे… पुणे जिल्ह्यातील कुठल्याही सरकारी दवाखान्यात पुरेशी यंत्रणा नसते. सक्षम डॉक्टर, औषधांचा पुरवठा आणि अद्ययावत यंत्रणा पुणे जिल्ह्यातील सर्व सरकारी दवाखान्यात आहेत का याचं ऑडिट झाले पाहिजे. या निमित्ताने सर्व सरकारी दवाखान्यांची चौकशी झाली पाहिजे.

पुणे जिल्ह्यातील कुठल्याही सरकारी दवाखान्यात पुरेशी यंत्रणा नसते. काही सरकारी डॉक्टर आपला खाजगी दवाखाना चालवत आहेत,ते बंद झाले पाहिजे, आणि सरकारी डॉक्टर ने सरकारी दवाखान्यातच आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे,सक्षम डॉक्टर, औषधांचा पुरवठा आणि अद्ययावत यंत्रणा पुणे जिल्ह्यातील सर्व सरकारी दवाखान्यात आहेत का याचं ऑडिट झाले पाहिजे. या निमित्ताने सर्व सरकारी दवाखान्यांची चौकशी झाली पाहिजे. अशी संभाजी ब्रिगेड ची जिल्हाधिकारी यांना विनंती आहे, जेणेकरून भंडारा येथील दुर्दैवी घटना पुणे जिल्ह्यात घडणार नाही.

जिल्ह्यात जेवढे सरकारी दवाखाने आहेत, त्या दवाखान्यातील काही डॉक्टर हे दवाखान्यात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या गरीब नागरिकांशी मनमानी स्वभावात वागतात,जिल्ह्या मध्ये असे कितीतरी हॉस्पिटल मध्ये चुकीची पद्धत वापरली जाते कोठेही नियमावली नाही, सरकारचे ऑडिट होत नाही त्यांची मनमानी सर्वच ठिकाणी चालू असते, आशा सर्व हॉस्पिटल ची चौकशी केली गेली पाहिजे. सार्वजनिक रुग्णालय सेवा सर्व गरीब सर्वसामान्यांना भिक दिल्या सारखी तसेच निष्काळजीपणाची वागणूक जनरली दिली जाते.

आणि ती सेवा व्यवस्थितपणे सर्वसामान्यांना देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता पावले उचलावीत, जेणेकरून भंडारा येथे निष्पाप बालकांचा निष्काळजीपणामुळे मृत्यु झाला आहे, तशीच दुर्दैवी घटना पुणे जिल्ह्यात घडणार नाही, संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना आव्हाहन आहे आपण लक्ष घालून जिल्ह्यातील महापालिका आणि ग्रामीण सरकारी दवाखाण्याचे लवकरात लवकर ऑडिट करावे.

अन्यथा संभाजी ब्रिगेड च्या कार्यकर्त्यांना संभाजी ब्रिगेड च्या स्टाईल ने ऑडिट करावे लागेल, तशी वेळ जिल्हा प्रशासनाने संभाजी ब्रिगेड च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर येऊ देऊ नये,आणि येत्या आठ दिवसात सर्व दवाखाण्याचे ऑडिट करावे ही आदरयुक्त विनंती आहे.यावेळी निवासी जिल्हाधिकारी जयश्री कटारे मॅडम यांना निवेदन देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here