कीनॊद येथील तरुणाचा तापी नदीत बुडून मृत्यू

0
242

जळगाव ; तालुक्यातील सावखेडा ( किनॊद) येथील २१ वर्षीय युवकाचा तापी नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना आज उघडकीस आली .

या बाबत अधिक माहिती अशी कि, मंगळवार दि. २४ मार्च रोजी ४ वाजेच्या सुमारास तालुक्यातील सावखेडा (किनॊद ) येथील अजय मुरलीधर पाटील या युवकाचा तापी नदीच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. धामणगाव हायस्कुल चे शिक्षक मुरलीधर प्रल्हाद पाटील यांचे ते चिरंजीव होत. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक जाधव यांनी मृत झाल्याचे घोषित केले. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहा. फौजदार लावसिंग पाटील हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here