जामनेर न्यू इंग्लिश स्कूल शिक्षकांचा प्रताप!! पार्टी करतानाचे फोटो विद्यार्थ्यांच्या गृपमध्ये !! व्हायरल फोटोची जामनेरात खळबळजनक चर्चा ! शिक्षण क्षेत्राला कलंक लावणारी घटना !!

0
255

IBN एकमत न्युज नेटवर्क                                                        जामनेर ;-

जळगाव जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात जामनेरला शिक्षणाची पंढरी म्हटले जाते. या शिक्षणाच्या पंढरीत अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन देश-परदेशात सेवा करत आहेत. जामनेरच्या स्थानिक शहरातील नामांकित शाळेतील शिक्षकांनी पार्टी करत विद्यार्थ्यांच्या ग्रुपमध्ये त्यांचे पार्टीचे फोटो टाकले .विद्यार्थी आणि पालकांच्या या शैक्षणिक समूहामध्ये अशा प्रकारचे फोटो प्रसारित करून शिक्षणक्षेत्राला एक प्रकारे बदनाम केले आहे. विद्यार्थ्यांच्या ग्रुपमध्ये शिक्षक पार्टीचे भोजन करताना स्पष्टपणे दिसत आहेत .शिक्षणक्षेत्राला काळीमा लावणाऱ्या या प्रकाराची सर्वत्र निंदा होत आहे. झालेला प्रकार संतापजनक असून संस्थाचालक संबंधितांवर काही कारवाई करणार की नाही अशीच मागणी पालकांमधून येत आहे. विशेष म्हणजे ज्या वर्गाच्या शैक्षणिक समूहामध्ये रोज अध्यापन केले जाते, त्याच समूहामध्ये शिक्षक ,शिक्षिका, विद्यार्थी ,विद्यार्थिनी आणि पालक आहेत .जागृत पालकांनी ही घटना उघडकीस आणल्याने त्यांचे कौतुक होत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की न्यू इंग्लिश स्कुल ,जामनेरच्या इयता ५ वी जे तुकडीच्या विद्यार्थी आणि पालकांसाठी कोरोना कालखंडात ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी ग्रुप स्थापन केला आहे. न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रत्येक वर्गाच्या प्रत्येक तुकडीचे वेगवेगळे ग्रुप असून या ग्रुप मधून ज्ञानदानाचे कार्य शिक्षक नित्यनेमाने करत आहेत .अनेक शिक्षक हे उत्कृष्टपणे कार्य करत असताना एक धक्कादायक प्रकार व्हाट्सएपच्या विद्यार्थ्यांच्या ग्रुपमध्ये घडून आला.
विद्यार्थी ,पालक,शिक्षक असलेल्या शालेय या गृपवर दस्तुरखुद्द शिक्षकांनीच दारू भोजन पार्टीचे फोटो अपलोड केले .
या फोटोमध्ये उपशिक्षक रुपेश मधुकर बाविस्कर , सल्लूसिंग गिमल्या शेवाळे आणि चंद्रमणी उत्तमराव पानपाटील हे तिघे एका टेबलावर बसून पार्टी करत असल्याचे दिसून येत आहे.
व्हायरल फोटोचे सूक्ष्म निरीक्षण केले असता पार्टीसाठी बसलेले हे तिन्ही शिक्षक एकदम तर्रर्र झालेले दिसत असून ते अतिशय आनंदात फोटो काढत असून फोटोसाठी पोजही देत आहे .
ज्या वेळेला विद्यार्थ्यांच्या ग्रुपमध्ये हे फोटो आले त्या वेळेला पालकांमधून एकदम संतापाची लाट उसळली आहे .सर्वच पालकांनी संस्थाचालकांना जाब विचारायला प्रारंभ केला .
दरम्यान संस्थेच्या प्रभारी मुख्याध्यापिका यांनी या घटनेच्या संदर्भात कानावर हात ठेवण्याची भूमिका घेतल्याने एक प्रकारे तेथून या अशा प्रवृत्तीच्या लोकांची पाठराखण केली जाते आहे की काय असा प्रश्न विचारला जात आहे.
घडलेला प्रकार हा शिक्षणक्षेत्राला आणि जामनेरच्या नावलौकिकाला कलंक लावणारा असल्याची भावना शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे .शिक्षण पंढरीत अशा प्रकारच्या घटना घडत असतील ग्रूप मधूनच हे शिक्षक असे वर्तन करत असतील तर प्रत्यक्ष वर्गात काय करत असतील? असा प्रश्न विचार ला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here