वाढदिवस साजरा करण्याच्या पारंपारिक केक पध्दतीला फाटा देत पाटील कुटुंबाने शेतकरी अन्नदात्याला दिला आगळावेगळा पाठिंबा ,केक ऐवजी टरबुज कापून खुशालने केले शेतकरी वर्गाला वंदन, शिवधर्म गाथा, तुकोबाराय गाथा, व शिवरायांच्या पुस्तकांचे वाटप करुन साजरा केला वाढदिवस .

0
149

नवी दिल्ली, ;-१७ मार्च २०२१- दिल्लीतील १७ वर्षीय युवक खुशालशेठ पाटील याचा वाढदिवस कुटुंबाने टरबूज कापून, फळवाटप आणि शिवधर्म गाथा, तुकोबाराय गाथा, व शिवराय पुस्तकांचे वाटप करुन साजरा केला.
वाढदिवस साजरा करण्याच्या पारंपारिक केक पध्दतीला फाटा देत पाटील कुटुंबाने शेतकरी अन्नदातांच्या आठवणीने हा आगळावेगळा वाढदिवस साजरा केला. केक ऐवजी टरबुज कापून खुशालने शेतकरी वर्गाला वंदन म्हणून प्रातिनिधीक स्वरुपात छत्रपती शिवराय महाराज व जगदगुरु तुकोबाराय यांना वंदन केले. उपस्थितांनी टाळयांच्या गजरात खुशालशेठ यांस शुभेच्छा दिल्यात. संत्रे, सफरचंद, द्राक्षे, टरबुज या फळांचा फराळ वाटप करुन वाचक मंडळींना जगदगुरु तुकोबाराय गाथा, शिवधर्म गाथा, शिवराय पुस्तक तथा मराठासेवासंघाची (इंग्रजी) शिवधर्म दिनदर्शिका -२०२१ भेट दिली. सर्वांसोबत जिजाऊ वंदना झाल्यावर, राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय महाराज, छत्रपती संभाजी महाराज, जगदगुरु तुकोबाराय, सर्वोत्तम भूमीपुत्र तथागत गौतमबुध्द, चक्रवर्ती महासम्राट बळीराजा यांना उपस्थितांनी वंदन केले.
आपल्या संक्षिप्त आभारात खुशालशेठ यांनी आपल्यावाणीने उपस्थितांना अनुभव कथन ऐकवले. एकदा शाळेत थोडे कमी मार्क मिळाले म्हणून वडिलांनी गोड आवाजात झापले. मी स्पष्टीकरण दिले परंतु वडिलांनी वेळोवेळी जे मार्गदर्शन केले त्यातील एक वाक्यांची हळू आवाजात त्यांच्याच शब्दात आठवण करुन दिली कि , “मेरे बापने कहा है कि रोटी कमाने के लिए कागजी डिग्रीयों की जरुरी नही होती” . पप्पा जोरसे हंस पडे थे.
याप्रसंगी प्रा. प्रमोद मडके जी, शिवमती मंदाबाई गुलाबराव अहिरराव, शिवमती मंजुषाजी मंडके, शिवमती संध्याताई अनिलकुमार पाटील, श्री. अजय मुन, श्री. राजेंद्र मडके जी, शिवाचार्य श्री. विक्रम सोळसे जी, श्री. सत्येंद्र कुमार पटेल, अर्थशिर्ष मंचचे संयोजक पारस पाटील यांनी खुशाल यांस शुभेच्छा दिल्यात.
————–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here