जामनेरचे माजी आमदार दत्तात्रय महाजन कालवश!

0
162

निधन वार्ता
माजी आमदार दत्तात्रय महाजन कालवश!

जामनेर / प्रतिनिधी
जामनेर तालुक्याचे माजी आमदार श्री दत्तात्रय उघडू महाजन यांचे आज आज सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले .ते 1985 ते 1990 पर्यंत जामनेर ग्रामपंचायतीचे सरपंच होते .नंतर 1990 ते 1995 या कालखंडात त्यांनी जामनेर तालुक्याचे आमदार म्हणून विधानसभेत प्रतिनिधित्व केले. जामनेर येथील सुप्रसिद्ध इंदिरा बाई ललवाणी शैक्षणिक संस्थेचे ते संस्थापक होते .दत्तात्रय महाजन पतपेढी ,श्री कृष्ण दुध डेअरी, जामनेर फ्रूट सेल सोसायटी आदी संस्थांमध्ये त्यांनी अध्यक्षपद भूषविले आहे .काही काळ जामनेर तालुका सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पदही त्यांनी भूषविले आहे .त्यांच्या पश्चात पत्नी , सुनबाई ,चार मुली ,जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. ग्राम विकास तरुण मित्र मंडळाचे उपाध्यक्ष विनीत महाजन यांचे ते आजोबा होत.तर ललवाणी शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष राजेंद्र महाजन ,संजय महाजन ,प्रा.दिनेश महाजन यांचे मोठे वडील होत.
रात्री १०.३० वाजता त्यांच्या पार्थिवावर जामनेर येथे अंत्य संस्कार करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here