*स्वतःचा व्यवसाय बंद करून हॉटेल शुभम कोविड सेंटरला विनामूल्य देणार……* प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार भोसले यांचा निर्धार !! सुपाच्च भोजन,नाष्टाही देणार !!

0
151

 

IBNएकमत न्यूज नेटवर्क
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
कोरोना संक्रमण रोखण्यासाठी आणि कोरोना बाधित रुग्णांना मदत आणि सेवा कार्य पुरविण्यासाठी जळगाव जिल्ह्यातून अनेक हात पुढे येत आहेत ! याच श्रुंखलेत जळगाव जिल्हा प्रहार जनशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार भोसले यांनी निर्धार केला असून स्वतःचा व्यवसाय बंद करून आपली वास्तू कोरोना रुग्णांसाठी देण्याचा निर्धार केला आहे. विजय भोसले यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे!!

संपूर्ण जगात देशात कोरोनाची महाभयंकर अशी दुसरी लाट सुरू असून त्यात आपले राज्य व शासन खूप बिकट परिस्थितीत असून महाराष्ट्रात दिवसेंदिवस खूप रुग्ण वाढत आहेत .

त्यातच दुर्दैव असे की महाराष्ट्रात आपला जळगाव जिल्हा सुद्धा टॉप टेन मध्ये असून अतिशय भयानक परिस्थिती आहे. *सर्व दूर बेड शिल्लक नाहीत.. ऑक्सिजन मिळत नाही..! यामुळे असंख्य रुग्णांचे जीव गमवावे लागत आहेत…,!*

त्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार रायभान भोसले यांनी भडगाव येथील स्वतःची *हॉटेल शुभम बंद करून कोवीड सेंटरसाठी विनामूल्य देण्याचे जाहीर केले आहे ! तसेच त्या ठिकाणी स्वतःच्या खर्चाने 20 ऑक्सिजन बेड सुद्धा* ते तयार करून देणार आहेत. याविषयी विजयकुमार भोसले यांनी स्वतः आरोग्य मंत्री राजेश टोपे, त्याचप्रमाणे त्यांचे स्वीय सहाय्यक निलेश देशमुख, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत , जिल्हा शल्यचिकित्सक चव्हाण यांना स्वतः फोन करून या विषयी विनंती केली होती की मी स्वतः 20 ऑक्सीजन बेड देतो आणि होटेल विनामूल्य ….विना मोबदला देण्यास तयार आहे.

त्याची दखल घेऊन वरिष्ठांनी जिल्हा शल्यचिकित्सक आदरणीय चव्हाण तसेच दिल्ली येथील केंद्रीय पथक व संबंधित अधिकारी वर्ग यांनी दिनांक 11 =4=2020 रोजी स्वतःहून प्रत्यक्ष हॉटेलची पाहणी केली व सदर ठिकाणची जागा अतिशय चांगली व नैसर्गिक असून योग्य आहे असे सांगितले. जशी परिस्थिती निर्माण होईल त्यानुसार आपली मदत घेवून येथे सेंटर आपण सुरू करूया असे आश्वासन दिले .
सदर कोवीड सेंटर सुरू झाल्यास आम्ही प्रहार द्वारे व मित्रमंडळी द्वारे *दोन वेळचे ऊकृष्ट असा चहा.. नाश्ता..अंडी..दूध.. व जेवण विनामूल्य रुग्णांना पुरवू असे आश्वासन सुद्धा प्रहार शहर अध्यक्ष प्रशांत संतोष पाटील प्रहारचे सक्रीय कार्यकर्ते देवा महाजन यांनी दिले!*
अशा भयानक आणि विदारक परिस्थिती मध्ये आपण स्वतःहून दोन पावलं पुढे येऊन नागरिकांची सेवा करण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे आणि कुठेतरी माणुसकीच्या धर्मातून ही माणुसकी जोपासली पाहिजे.आणि रुग्णांचे प्राण वाचविले पाहिजे. मी स्वतः माझा व्यवसाय बंद करून हॉटेल तर देतच आहे पण या व्यतिरिक्त 20 बेड व आम्ही सर्व प्रहार परिवार मित्र मंडळ यांच्यामार्फत जेवण नाष्टा सुद्धा देण्याचे ठरविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here