हरिभक्त पती-पत्नीचे एकादशीच्या दिवशी वैकुंठगमन सावखेडा परिसरात हळहळ व्यक्त

0
127

सावखेडा तालुका रावेर

येथील मनमिळावू स्वभावाचे सर्वांच्या सुखदुःखात मध्ये सहभागी होणारे धार्मिक-आध्यात्मिक कार्यामध्ये सहभागी असणारे आईसाहेब मुक्ताबाई चे वारकरी देविदास सदाशिव पाटील (वय77 )आणि त्यांच्या सौभाग्यवती मनकर्णिका देवीदास पाटील[ वय 70] यांचे एकाच दिवशी कामदा एकादशीला दि.२३ रोजी वैकुंठ गमन झाले. धार्मिक-अध्यात्मिक परिवारातील पती-पत्नी एकाच दिवशी मृत्यू पावल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .

याबाबत सविस्तर वृत्त असे की सावखेडा तालुका रावेर येथील प्रमोद पाटील आणि संजय पाटील यांचे वडील नामे देविदास सदाशिव पाटील आणि मंनकर्निका देवीदास पाटील या पती-पत्नीचे एकादशीच्या दिवशी निधन झाले .सुरुवातीला मणकर्निका बाई यांना देवाज्ञा झाली आणि पाच तासाने त्यांचे पती देवीदास पाटील यांचे प्राणोत्क्रमण झाले.
परिसरातील धार्मिक कार्यात त्यांचा सहभाग असायचा. आईसाहेब मुक्ताबाई आणि श्री विठ्ठल भक्त असलेल्या या परिवारावर एकाच दिवशी दुःखाचा डोंगर कोसळला असला तरी त्यांचे कामदा एकादशीच्या दिवशी निधन झाल्याने ते साक्षात श्रीहरी पदी विलिन झाल्याची भावना जनसामान्यांमध्ये निर्माण झाली आहे .
त्यांच्या पश्चात दोन मुले आणि तीन मुली सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here