जामनेर येथे १ मे रोजी महाराष्ट्र दिन आणि स्व.किशोर चंपालाल बोहरा यांच्या६ व्या स्मृतीदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर

0
132

जामनेर दि,30 : महाराष्ट्र दिन,कामगार दिन तसेच स्व. किशोर चंपालाल बोहरा यांच्या स्मृतीदिना निमित्त वाकी रोड जामनेर येथे नवकार प्लाझा जवळ बेस्ट बाजार प्रांगणात १ मे रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे . कोरोना संकट काळात तसेच उन्हाळा असल्याने रुग्णांसाठी रक्ताचा तुटवडा जाणवत आहे त्यामुळे रक्तदात्यांना रक्तदान करण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे .
सध्या सर्वत्र कोरोना संक्रमणामुळे रक्त संकलनात प्रमाणात घट झाली आहे . मात्र रक्ताची गरज कायम आहे त्यामुळे दवाखान्यांमध्ये गरजू रुग्णांना रक्ताची कमतरता भासत आहे .ही उणीव दूर करण्यासाठी जामनेर शहरात जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनानिमित्त शनिवार दि १ मे रोजी विविध संस्था संघटनांच्या समन्वयातून भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे .
रक्तदात्यांनी ‘ठेवूया जाण माणुसकीची मशाल पेटवा माणुसकीची ‘हे भान जपत रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन त्रिनेत्र गीताई सेवा संस्था ,चंपालाल फुलचंद बोहरा, परिवार जैन श्री संघ जामनेर, तालुका फोटोग्राफर असोसिएशन .सावली प्रतिष्ठान,युवा सारथी प्रतिष्ठान, अश्वमेध बहुद्देशीय संस्था ,क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले चॅरीटेबल ट्रस्ट ,जननायक फाउंडेशन ,महात्मा फुले ब्रिगेड ,व्यंकटेश बचत गट ,हाजी सय्यद करीम वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी जामनेर, तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळ ,एम एच सरकार न्यूज चॅनल तसेच सर्व मित्र परिवाराच्या संयुक्त विद्यामाने हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे .
कोरोना नियमांचे पालन करून रक्तदान शिबीर होणार असल्याने रक्तदात्यांनी एकाच वेळेला गर्दी न करता 942O389818 आणि 7218187777 या क्रमांकावर संपर्क साधून नोंदणी करावी .
नोंदणी झालेल्या रक्तदात्यांना आयोजकांतर्फे योग्य वेळेत रक्तदानासाठी रक्तदान स्थळी बोलावण्यात येईल .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here