मुद्रांक विक्री बंद..कामे खोळंबली; केली जातेय अडवणूक

0
165

जामनेर :- येथील स्टॅंप विक्रेत्यांकडे गेल्या 2 महिन्यापासुन 100 व त्यापेक्षा जास्त शुल्काचे स्टॅंप उपलब्ध नसल्याने नागरीकांना स्टॅंपसाठी भटकंती करावी लागत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील कोशागार कार्यालयातुन वितरण केले जात असते. याबाबत ची विचारणा केली असता जामनेर कोशागारातुनच स्टँप मिळतील असे सांगण्यात आले. जामनेर कोशागार कार्यालयाने स्टॅंपची मागणी केलेली नसून पुढील आठवड्यात येतील असे उत्तर मिळत असल्याचे नागरीकांची तक्रार आहे.जामनेरला सुमारे 40 परवानाधारक स्टॅंप विक्रेते असले तरी मोजके 4 ते 6 जण स्टॅंप घेतात. याबाबत वकीलांनी तहसीलदारांकडे स्टॅंपचा सुरळीत पुरवठ्याबाबत तक्रार केली होती. स्टॅंपच्या तुटवड्यामुळे तालुक्यातील नागरिक शेजारील सोयगावहून स्टँप आणतात.

अनेकांना लोकांना शेती विषयी कर्ज घेण्यासाठी तसेच अन्य शेतीच्या कामांसाठी स्टँपची गरज असते. परंतु ते मिळत नसल्याने विविध वेंडर्सच्या माघे शेतकरी वर्ग फेऱ्या मारत आहे. आज मिळणार, उद्या मिळणार अशीच उत्तर देखील त्यांना मिळत असतात. स्टँप मिळत नसल्याने काही जणांनी तर थेट जळगाव गाठून तेथून स्टँप खरेदी केल्याचे समजते.तहसील कार्यालयाकडून शासकीय, बँक, न्यायालय आदी कामांसाठी आवश्यक असणाऱ्या मुद्रांक विक्रीस कोरोनाचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव पाहता मनाई केल्याने जामनेरकोषागार कार्यालयाकडून मुद्रांक देणे बंद केले आहे. यामुळे मुद्रांक विक्रेत्यांकडे (Stamp sales) चकरा मारणाऱ्या सामान्य नागरिक, महिला तसेच शेतकऱ्यांची कामे खोळंबली आहेत. सुधारित आदेश काढून मुद्रांक विक्री नियमितपणे सुरू करण्याची अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here