ना. बच्चुभाऊ कडू यांचा वाढदिवस जामनेर तालुक्यात विविध उपक्रमांनी साजरा

0
132

जामनेर /विशेष प्रतिनिधी

महाराष्ट्र सरकार मधील मंत्री नामदार बच्चुभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्ताने जामनेर तालुका प्रहार जनशक्ती संघटनेच्यावतीने प्रहार जनशक्तीचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख अनिलभाऊ चौधरी व जिल्हा अध्यक्ष विजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात आले .जामनेर शहराजवळील शिंगाईत या गावी शेताच्या बांधावर जाऊन शेतमजूर महिलांना खुरपे वाटप करण्यात आले .तसेच त्यांना अल्पोपहार देण्यात आला .

दुसऱ्या एका कार्यक्रमात प्रहार जनशक्ती संघटनेच्या वतीने जामनेर च्या तहसील कार्यालयात वृक्षारोपणही करण्यात आले .वृक्षारोपण कार्यक्रमास जामनेरचे तहसीलदार श्री.अरुण शेवाळे ,नायब तहसीलदार श्री.सुभाष कुंभार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते .
जामनेर तालुका प्रहार जनशक्ती संघटनेचे  मनोजकुमार महाले, प्रदीप गायके, जीवनमामा सपकाळ ,दिपक कचरे ,मयुर पाटील ,वसंता माळी ,शिवा माळी, योगेश पाटील ,सचिन बोरसे , ,दशरथ पाटील ,पवन माळी,सुभाष सोनवणे ,मनोज गावंडे ,बंटी भोई,अनिल हडप इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जामनेर तालुक्यात प्रहार जनशक्ती संघटनेचा लवकरच विस्तार करण्यात येणार असून ना.बच्चूभाऊ कडू यांच्या उपस्थितीत मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मनोजकुमार महाले यांनी सांगितले .
जामनेर तालुक्यातील जनतेने त्यांच्या अडीअडचणी लेखी अथवा तोंडी कळवल्यास अडचणी त्वरित गतीने सोडवण्यात येतील,असे जीवन सपकाळ यांनी सांगितले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here