‘शुभेच्छा जी’… वाढदिवसानिमित्त बच्चू कडूंना पत्नीचं ‘गोड’ पत्र

0
59

बच्चू कडू यांच्या एका खास व्यक्तीने त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने दिलेल्या भन्नाट शुभेच्छा हा चर्चेचा विषय ठरला. त्यांना भन्नाट शुभेच्छा देणाऱ्या खास व्यक्ती दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून त्या आहेत त्यांच्या पत्नी डॉ. नयना कडू.                                                            अमरावती – राज्यमंत्री बच्चू कडू यांचा काल (सोमवार) वाढदिवस साजरा झाला. त्यांच्या प्रत्येक कार्यकर्त्यांने आणि हितचिंतकांनी वेगवेगळ्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तर अनेकांनी सामाजिक कार्य करून राज्यमंत्री बच्चू कडू यांचा वाढदिवस साजरा केला. सोशल मिडियावर तर बच्चू कडू यांच्या वाढदिवसाच्या पोस्टचा अक्षरशः धुमाकुळ होता. पण या सर्वांमध्ये बच्चू कडू यांच्या एका खास व्यक्तीने त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने दिलेल्या भन्नाट शुभेच्छा हा चर्चेचा विषय ठरला. त्यांना भन्नाट शुभेच्छा देणाऱ्या खास व्यक्ती दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून त्या आहेत त्यांच्या पत्नी डॉ. नयना कडू. पती आणि पत्नीचे नाते प्रेमाचे आणि पावित्र्याचे आहे. त्यामुळे पत्नी आपल्या पतीला आगळ्या-वेगळ्या शुभेच्छा देतात. तशाच शुभेच्छा नयना कडू यांनीही आपल्या पतीला दिल्या आहे. …                                                   अशा दिल्या शुभेच्छा – शुभेच्छा जी…    पाहिजे तेव्हा कोणत्याही गावातील स्टॅण्डवरचा ‘वडा’ खायला मिळो… वाटेल तेव्हा नदीत मनसोक्त ‘पोहायला’ मिळो… इच्छा होईल तेव्हा कबड्डीच्या मैदानावर ‘एन्ट्री’ मारायला मिळो… पिक्चर रिलीज झाल्याबरोबर लगेच पाहायला मिळो… अन् रोज सकाळी नयनाला चहा करुन घ्यायला मिळो… शेवटी काय आनंद ही आनंद मिळो.. अशा आशयाची डॉ. नयना कडूंनी चिठ्ठी लिहून बच्चू कडू यांना त्यांच्या स्वभावानुरूप शुभेच्छा दिल्या..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here