लोकमत समुह व प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या संयुक्त विदयमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ; भडगाव येथे ७५ जणांनी केले रक्तदान. मुली, महीला, सैनिक, शिक्षकांचाही सहभाग.

0
38

——————————————भडगाव येथे ७५ जणांनी केले रक्तदान. मुली, महीला, सैनिक, शिक्षकांचाही सहभाग. ——————————————— भडगाव येथे लोकमत समुह व प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या संयुक्त विदयमाने दि. १८ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकुण ७५ जणांनी रक्तदान केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाचोरा भडगाव मतदार संघाचे राष्टृवादीचे माजी आमदार दिलीप वाघ हे होते. तर या रक्तदान शिबिराचे उदघाटन भडगाव पाचोरा मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांनी केले. या रक्तदान शिबिरात नागरीक , सैनिक, शिक्षक, तरुण, मुली, महिलांनी उत्सुफुर्तपणे सहभाग घेतला. यावेळी व्यासपिठावर प्रथम नगराध्यक्ष शशिकांत येवले, डाॅ. विशाल पाटील, कजगाव वाडे गटाचे जि प सदस्य डाॅ. कर्तारसिंग परदेशी, राष्टृवादीचे प्रवक्ता खलील देशमुख, लिलावती फौंडेशनचे अध्यक्ष डाॅ. प्रमोद पाटील, नायब तहसिलदार रमेश देवकर, पोलीस निरीक्षक अशोक उतेकर, ग्रामीण रुग्णालयाचे वैदयकिय अधिकारी डाॅ. पंकज जाधव, गोदावरी मेडीकल काॅलेजचे प्रा. डाॅ. नितीन सोनवणे, बाजार समितीचे प्रशासक संचालक युवराज पाटील, बाजार समितीचे माजी संचालक राजेंद्र पाटील, राष्टृवादी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील, बाजार समितीचे प्रशासक संचालक रणजीत पाटील, लोकमतचे भडगाव तालुका वार्ताहर अशोक परदेशी, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार भोसले, शिवसेना शहर प्रमुख योगेश गंजे, माजी नगरसेविका योजना पाटील, वाडे प्रथम महिला उपसरपंच ऊषाबाई परदेशी, साई अॅटोचे संचालक रावसाहेब पाटील, प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, सरचिटणीस देवा महाजन, पाचोरा तालुका वकील संघाचे माजी अध्यक्ष अॅड राजेंद्र परदेशी, पी बी सी मातृभुमी चॅनलचे प्रविण ब्राम्हणे, राजेंद्र ठाकरे, कान्टृक्टर संभाजी पाटील, भडगाव तालुका पञकार संघाचे माजी उपाध्यक्ष जावेद शेख, नाभिक समाजाचे तालुकाध्यक्ष संजय पवार, पिपल्स बॅकेचे संचालक डी डी पाटील, सोनु शेख, प्रहार एरंडोल तालुका अध्यक्ष सुनिल पाटील, एरंडोल आर पी आय अध्यक्ष प्रविण बाविस्कर यांचेसह मान्यवर नागरीक, तरुण , शिक्षक, मुली, महिला उपस्थित होत्या . तसेच आमदार किशोर पाटील, माजी आमदार दिलीप वाघ यांचेसह मान्यवरांचे हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपञ, पुष्पगुच्छ देउन सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम दि. १८ रोजी भडगाव पंचायत समितीच्या सभागृहात पार पडला. भडगाव येथे एकुण ११६ रक्तदात्यांनी केले रक्तदान— भडगाव येथे यापुर्वी पहील्या शिबिरात ४१ जणांनी रक्तदान केले होते. या दि. १८ रोजीच्या शिबिरात ७५ जणांनी रक्तदान केले. भडगावला असे एकुण ११६ जणांनी रक्तदान केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here