आषाढी एकादशीच्या पर्वावर प्रा.रामकृष्णा महाराज पाटील लिखित श्री.शंकर दर्शन अभंगचरित्र ग्रंथाचे नाशिक येथे प्रकाशन!

0
40

जामनेर /नाशिक [ प्रतिनिधी]

जामनेर येथील प्रसिद्ध संत साहित्यिक ,विचारवंत प्राध्यापक श्री .ह .भ .प .रामकृष्ण महाराज पाटील लिखित अंतापुरला जन्माला येऊन धनकवडी येथे समाधी घेतलेले महान संत श्री सद्गुरू शंकर महाराज यांच्या जीवनावर आधारित “श्री शंकर दर्शन “या अभंग चरित्राचे प्रकाशन आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर नाशिक येथील शंकर महाराज मठात दिनांक २० जुलै रोजी मंगळवारी दुपारी एक वाजता होत आहे .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध अध्यात्मिक लेखक आणि वरिष्ठ पत्रकार श्री. सावळीराम तिदमे हे राहणार असून अखिल भारतीय सूर्योदय सर्वसमावेशक साहित्य मंडळाचे अध्यक्ष श्री. सतिष जैन यांच्या हस्ते या ग्रंथाचे विमोचन होणार आहे .तर प्रमुख अतिथी म्हणून नाशिक येथील सामाजिक कार्यकर्ते श्री गिरीश चिटणीस हे उपस्थित राहणार आहे .
श्री हरिभक्त परायण प्राध्यापक रामकृष्ण महाराज पाटील हे जामनेर येथील इंदिराबाई ललवाणी कनिष्ठ महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक असून कीर्तनकार आहेत .त्यांनी आतापर्यंत संत तुकाराम महाराज, संत सेना महाराज ,संत नामदेव महाराज ,संत मुक्ताबाई यांच्या अभंग चरित्रांचे लेखन केले असून सुमारे पंचवीस ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत .तर अजून पंधरा ग्रंथ प्रसिद्धीच्या मार्गावर आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर राखून अत्यंत मर्यादित स्वरूपात होणाऱ्या या प्रकाशन समारंभास उपस्थित राहावे असे आवाहन श्री शंकर महाराज मठाचे प्रमुख महंत संजय महाराज हिरे ,श्री राजेंद्र परदेशी, मठाचे पुजारी श्री .शहाणे, श्री .अनिल वाळुंजे ,श्री .रूपेश पाटेकर ,श्री बाळासाहेब गुंजाळ ,श्री .भगवान भारती आणि शंकर महाराज अन्नछत्र ट्रस्ट मंडळ उत्तम नगर नाशिक यांनी केले आहे .
शंकर महाराज हे महाराष्ट्रातील आणि संपूर्ण भारतात प्रख्यात अशा विभूती होऊन गेल्या .त्यांचा जन्म अंतापुर तालुका सटाणा जिल्हा नाशिक येथे झाला असून त्यांनी 1947 साली पुण्याजवळील धनकवडी येथे समाधी घेतली आहे .त्यांच्या जन्माच्या बाबत सत्य सांगणारे अभंग चरित्र या ग्रंथात अखंड ओवी रुपाने ग्रंथीत करण्यात आले आहे .याआधी श्री .अनिल वाळुंजे लिखित अंतापूरचे अवलिया या ग्रंथात शंकर महाराज यांच्या जीवन चरित्राचे सत्य कथन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here