कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही आला पॉझिटिव्ह

0
237

गायिका कनिका कपूरची तब्बल चार वेळा करोना विषाणूची चाचणी करण्यात आली. चौथ्यांदाही तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार कनिकाच्या पहिल्या तीन चाचणींच्या रिपोर्टवर तिच्या कुटुंबियांनी शंका उपस्थित केल्या होत्या. त्यामुळे तिची चौथ्यांदा चाचणी करण्यात आली. मात्र ही चाचणी देखील पॉझिटिव्ह आली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या कनिकाची प्रकृती स्थिर आहे. शनिवारी तिची करोना चाचणी घेण्यात आली. यावेळी तिच्या शरीरात करोना विषाणूचा हाय डोस आढळला.

कनिकाची पहिल्यांदा चाचणी केल्यावर आलेल्या रिपोर्टमध्ये तिचे वय आणि लिंग यांची माहिती चुकीची देण्यात आली होती. त्या रिपोर्टमध्ये कनिकाचे वय २८ वर्षे व लिंग महिला ऐवजी पुरुष लिहिण्यात आलं होतं. त्यामुळे या रिपोर्टवर तिच्या कुटुंबीयांनी शंका उपस्थित केली होती. परिणामी तिच्या आणखी तीन वेळा चाचण्या घेण्यात आल्या. मात्र या सर्व चाचण्यांचा रिपोर्ट तिला करोना विषाणूचा संसर्ग झाल्याचेच सांगतो.

कनिका कपूर सध्या लखनऊ येथील संजय गांधी पीजीआयएमएस या रुग्णालयात उपचार घेत आहे. दरम्यान रुग्णालयात चांगल्या सुविधा मिळत नसल्याची तक्रार कनिका वारंवार करत आहे. मात्र आम्ही रुग्णांना सर्वोत्तम सेवा पुरवत असल्याचं रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. किंबहुना सेलिब्रिटी आहे म्हणून त्यांनी डॉक्टरांना त्रास न देण्यापेक्षा सहकार्य करावं, असं रुग्णालयाकडून सांगण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here