श्री.ह.भ.प.प्रा.रामकृष्णादादा महाराज पाटील ,जामनेरकर यांचा आद्य संत कवी म्हणून झाला बहुमान ! श्री शंकर दर्शन अभंग चरित्र , शंकर पाठ , शंकर चालीसा व अंतापुरचे अवलिया दुसऱ्या आवृत्तीचा नाशिक येथे रंगला प्रकाशन सोहळा!

0
39

जामनेर ;-  प्रतिनिधी

श्री शंकर महाराज मठ उत्तम नगर नाशिक येथे “श्री शंकर दर्शन”या अभंग चरित्राचे प्रकाशन आज आषाढी एकादशीच्या दिवशी करण्यात आले. श्री शंकर महाराज यांच्या जीवनावर अनेक ग्रंथ असुन अभंग स्वरूपात पहिलेच चरित्र प्रकाशित झाले आहे.
या ग्रंथाचे काव्यमय चरित्र लेखन ह .भ .प .श्री. रामकृष्णादादा महाराज पाटील जामनेरकर यांनी केले आहे.
उत्तम नगर मठाचे मठाधीपती परम पूज्य सद्गुरू श्री संजय हिरे महाराज यांच्या आशिर्वादाने व मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री सावळाराम तिदमे (आध्यात्मिक लेखक) , श्री सतिश जैन (अध्यक्ष अ .भा. सूर्योदय सर्व समावेशक साहित्य मंडळ ) , सामाजिक कार्यकर्ते श्री गिरीश भाई चिटणीस , साै. सुरेखाताई जाधव हे प्रमुख पाहुणे होते .

“अंतापुरचे अवलिया”(आवृत्ती दुसरी) व “श्री शंकर दर्शन”श्री शंकर महाराजांचे अभंग चरित्र सोबत “शंकर पाठ” व “शंकर चालीसा”असा अनमोल खजाना श्री शंकर महाराज मठ उत्तम नगर येथे मान्यवरांचे हस्ते प्रकाशित झाला.
सर्व मान्यंवराचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले . श्री.तिदमे,श्री.जैन ,श्री.चिटणीस ,ग्रंथ कर्ते रामकृष्णादादा महाराज मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत सद्गुरू श्री संजय महाराज व उत्तम नगर मठाविषयी सांगतांना श्री शंकर महाराज यांच्ये जन्म सत्य अगदी प्रखड पणे सांगणारे सद्गुरू श्री संजय हिरे महाराजांचे कौतुक केले . अंतापुरचे अवलिया” हा ग्रंथ सर्व शंकर भक्तांनी एकदा तरी वाचावा व श्री शंकर महाराजांचे जन्म सत्य समजून घ्यावे असे सांगितले .
तसेच श्री शंकर दर्शन अभंग चरित्राचे लेखक श्री. ह .भ .प .प्रा. रामकृष्णादादा महाराज पाटील यांचेही कौतुक करून अगदी आठच दिवसात एवढा मोठा अनमोल खजाना श्री शंकर भक्तांना दिल्याबद्दल आभार व्यक्त केले . त्यानिमित्ताने श्री.शंकर मठाचे वतीने श्री.ह.भ.प.प्राध्यापक रामकृष्णादादा महाराज यांना आधुनिक काळातील महाराष्ट्रातील सकळ संतांचे अभंगचरित्र लिहिल्याबद्दल आद्य संतकवी म्हणून प्रशस्तीपत्र देऊन बहुमान करण्यात आला.
श्री शंकर दर्शन या ग्रंथाचे सहाय्यक लेखक श्री अनिल भाऊ वाळूजे , ग्राफिक्स कार श्री सचिन भाऊ कंदलकर यांचाही सद्गुरू श्री संजय हिरे महाराज यांनी विषेश अभिनंदन केले. अनिल वाळुंजे व सचिन कंदलकर यांच्या मेहनती मुळेच आज आषाढी एकादशी दिवसी ग्रंथाचे प्रकाशन करता आले , असे श्री संजय हिरे महाराज म्हणाले .
तसेच आजच्या कार्यक्रमाला विशेष सहकार्य श्री अभिषेक भागवत यांचे लाभले.
ग्रंथ प्रकाशनासाठी अनेक श्री शंकर महाराज भक्त परिवार उत्तम नगर उपस्थित होते या सर्वाचे श्री. शंकर महाराज अन्नछत्र चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
प्रास्तविक श्री.सुभाष शहाणे यांनी ,सूत्रसंचालन श्री.बाळासाहेब गुंजाळ यांनी तर आभार प्रदर्शन श्री.अनिल वाळुंजे यांनी केले .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष परदेशी ,सागर हिरे,रूपेश पाटेकर,बाळासाहेब गुंजाळ,सद्गुरु शंकर महाराज अन्नछत्र ट्रस्ट अध्यक्ष सौ.शोभाताई हिरे , संदीप खरोटे , डी.जी.पाटील , मुरलीधर परदेशी यांनी परिश्रम घेतले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here