जामनेर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सात पोलिस कर्मचारी यांना विभागांतर्गत पदोन्नती

0
83

जामनेर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सात पोलिस कर्मचारी यांना विभागांतर्गत पदोन्नती, जामनेर (प्रतिनिधी) जामनेर पोलीस स्टेशन हद्दीत सेवा बजावणारे सात पोलीस कर्मचारी यांना जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे साहेब यांनी विभागाअंतर्गत पदोन्नती देण्यात आली. या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये बेटावद बिट चे सर्वांना हवेहवेसे वाटणारे सचिन पाटील, यांना पोलीस नाईक पदावरून पोलीस हेडकॉन्स्टेबल पदावर बढती देण्यात आली यांच्यासोबत जनार्दन सोनोने, संदीप पाटील सुनील राठोड हरीश पवार यांनाही पोलीस नाईक वरून पोलीस हेडकॉन्स्टेबल म्हणून पदोन्नती मिळाली तसेच शहापूर बीटचे राहुल पाटील व महिला पोलीस कर्मचारी तृप्ती नन्नवरे यांना पोलीस कॉन्स्टेबल पदावरून पोलीस नाईक म्हणून बढती देण्यात आली जामनेर पोलिस स्टेशनचे हे सातही पोलीस कर्मचारी कर्तव्यदक्ष तसेच प्रत्येक तक्रारदाराचे समाधान करून त्यांना योग्य तो न्याय देण्यासाठी परिचित आहेत त्या सर्व कर्मचाऱ्यांनी जनमानसात नेहमी पोलीस खात्याची प्रतिमा उंचावण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे अनेक गुन्ह्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी ही या सर्वांनी केलेली आहे सर्वच स्तरातून या सर्वांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे त्यांच्या निवडीबद्दल जामनेर पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय आपलेसे वाटणारे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश काळे यांच्यासह सर्वच स्टाफने सत्कार करून अभिनंदन केले आहे पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here