प्रहार जनशक्ती पक्ष जामनेर तालुका यांच्या प्रयत्नांने शहिद यश देशमुख या जवांनाच्या परीवाराचा स्वातंत्र्य दिनी सोनी टीव्हीच्या इंडियन आयडॉल या नँशनल शो मध्ये मुंबई येथे होणार सन्मान ! परिवाराचा सत्कार व दिली जाणार मदत!!

0
99

प्रहार जनशक्ती पक्ष जामनेर तालुका यांच्या प्रयत्नांने

शहिद यश देशमुख या जवांनाच्या परीवाराचा
स्वातंत्र्य दिनी सोनी टीव्हीच्या इंडियन आयडॉल या नँशनल शो मध्ये मुंबई येथे होणार सन्मान !
परिवाराचा सत्कार व दिली जाणार मदत!!

जामनेर प्रतिनिधी
सामाजिक सेवाकार्यास समर्पित
प्रहार जनशक्ती पक्ष जामनेर तालुका यांच्या प्रयत्नांने चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील २१ वर्षिय शहिद जवान यश दिगंबर देशमुख यांचे परीवाराचा स्वातंत्र्य दिनी indian idol sony tv या नँशनल शो मध्ये मुंबई येथे सन्मान व सत्कार व मदत दिली जाणार आहे!
स्वातंत्र्य दिनानिमित्ताने सोनी टीव्ही वर विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे.या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या जळगांव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगावच्या शहीद यश देशमुख यांचे वीर स्मरण करण्यात येईल .
गतवर्षी जम्मू-काश्मीरमध्ये यश देशमुख हा वीर जवान शहीद झाला होता .आतंकवाद्यांशी लढतांना जम्मू कश्मीर मधील दहशतवादी हल्ल्यात पिंपळगाव येथील जवान यश देशमुख वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी शहीद झाले होते .
त्यांचा सन्मान व्हावा म्हणून देशमुख परिवाराला सोनी टीव्हीच्या इंडियन आयडॉल या रियालिटी शोमध्ये सन्मानित करण्यात येणार आहे.
याकामी प्रहार जनशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार भोसले प्रहार जनशक्ती पक्ष जामनेर चे धडाडीचे कार्यकर्ते मनोजकुमार महाले [संपादक – आयबीएन एकमत न्युज ] प्रहार जनशक्ती संघटनेचे जामनेर तालुक्यातील वरिष्ठ नेते प्रदीप गायके वरिष्ठ पत्रकार व संपादक ] ,जितेंद्र माळी [व्हिडीओजर्नालिस्ट आयबीएन एकमत न्युज] ,मनोज दुसाने[ व्हिडीओ एडीटर – जीएम न्युज ]या टीमने सोनी टीव्ही सी संपर्क करून आमच्या जळगाव जिल्ह्यातील शहीद झालेल्या यश देशमुख यांना सन्मानित करण्यात यावे अशी मागणी केली .याची दखल घेऊन सोनी टीव्हीने देशमुख परिवाराचा सन्मान करण्यात येणार असल्याचे जाहीर केले!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here