रोज 1 लिंबू शरीरात गेल्याने होतील आश्चर्यकारक बदल, जाणून घ्या मोठे फायदे आणि सेवनाची पद्धत

0
184

Benefits of lemon: रोज एका लिंबाच्या सेवनामुळे आपल्या शरीरात अनेक आश्चर्यकारक बदल होऊ शकतात. लिंबाची चव भलेही आंबट असो, पण याचे अनेक फायदे असतात. जाणून घ्या काय आहेत लिंबाचे फायदे आणि खाण्याची पद्धत.

Key Highlights

  • जाणून घ्या आरोग्यासाठी कसे फायदेशीर आहे लिंबू
  • वजन कमी करण्यासाठी असते सहाय्यकारी
  • लिंबाच्या सेवनाने पोटाच्या वेदनेपासून मिळतो आऱाम

Benefits of lemon: आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत लिंबाचे फायदे (Lemon benefits). लिंबू हे आपल्या आरोग्यासाठी (health) खूप लाभदायक (beneficial) असते. असे म्हटले जाते की चवीला (taste) आंबट (sour) असलेल्या लिंबामध्ये (lemon) आरोग्यासाठी फायदेशीर असलेले अनेक गुण असतात. लिंबाच्या सेवनामुळे शरीराचे पाचनतंत्र (digestive system) व्यवस्थित राहते. तसेच चरबी (fat) कमी होते वजन घटते (weight loss).

जाणून घ्या आरोग्यासाठी कसे फायदेशीर आहे लिंबू

1. चेहऱ्यावरील मुरुमांपासून मिळते सुटका ;-

लिंबू हे आपल्या चेहऱ्यासाठीही फायदेशीर आहे. यात अँटीबॅक्टेरियल गुण असतात जे आपल्या चेहऱ्यावरील मुरुमे दूर करण्यात मदत करतात. या मुरुमांच्या इलाजासाठी लिंबाच्या बियांपासून तयार करण्यात आलेले तेलही खूप परिणामकारक असते.

2. वजन कमी करण्यासाठी असते सहाय्यकारी

पोटावरची चरबी आणि आपले वजन कमी करण्यासाठी रोज सकाळी एक कप कोमट पाण्यात अर्धे लिंबू पिळून ते रिकाम्या पोटी प्यावे. जर आपल्याला आवडत असेल तर आपण यात एक चमचा मधही घालू शकता. यामुळे आपण दिवसभर ताजेतवाने राहाल. सतत महिने हे पाणी प्यायल्याने आपल्याला फरक स्पष्ट दिसेल.ज्या लोकांना उच्च शर्करेचा त्रास आहे त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. खासकरून जे मधुमेहाचे रुग्ण आहेत आणि ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी हे लाभदायक आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण न वाढवता शरीरातला ओलावा कायम राखण्यासाठी लिंबू मदत करते आणि यामुळे ताकदही मिळते.

3. उच्च शर्करेच्या रुग्णांसाठी आहे लाभदायक ज्या लोकांना उच्च शर्करेचा त्रास आहे त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. खासकरून जे मधुमेहाचे रुग्ण आहेत आणि ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी हे लाभदायक आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण न वाढवता शरीरातला ओलावा कायम राखण्यासाठी लिंबू मदत करते आणि यामुळे ताकदही मिळते.

4. लिंबाच्या सेवनाने पोटाच्या वेदनेपासून मिळतो आऱाम

लिंबाचा रस आल्याच्या रसात मिसळून यात थोडी साखर मिसळून खाल्ल्याने आपल्याला पोटाच्या वेदनेपासून आराम मिळतो. भाज्या आणि आमटीवर लिंबू पिळून खाल्ल्यामुळे या भाज्या किंवा आमट्यांची चव तर वाढतेच, पण यातल्या पोषक तत्त्वांमध्येही वाढ होते. यामुळे हे पदार्थ लवकर पचण्यासही मदत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here