सर्वोत्कृष्ट तहसीलदार सन्मानित अरुण शेवाळे यांचा सकल मराठा समाजाच्या वतीने गौरव

0
68

जामनेर, (प्रतिनिधी) तालुक्याचे तहसीलदार अरुण शेवाळे साहेब यांना महसूल विभातील उत्कृष्ट कामाबद्दल पुरस्कार देण्यात येऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.अतीशय मनमिळाऊ व जनतेच्या कामामध्ये संवेदनशील असणारे व्यक्तिमत्व म्हणून संपूर्ण तालुक्याला अल्पावधीत परिचित झालेले आहे. त्यामुळे त्यांना सन्मानित करण्यात आल्यावर तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे . सकल मराठा समाज जामनेर तालुक्याचे वतीने त्यांचे अभिनंदन करून सन्मान पत्र शाल श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी विशाल लॉन्स अँड रिसॉर्ट चे संचालक डी .एन .चौधरी, शिंगाईत चे श्रीराम पाटील, टाकर खेडा ग्रामपंचायत सदस्य अर्जुन पाटील केकत निंभोरा येथील दशरथ पाटील प्रहार संघटनेचे युवक अध्यक्ष मयुर पाटील, परम पाटील,राजेंद्र पाटील,अतुल सोनवणे,अशोक पाटील,चंद्रकांत जंजाळ आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here