लॉकडाऊन’मध्ये त्याने घराच्या बॅकयार्डमध्ये धावून पूर्ण केली मॅरेथॉन!

0
338

Coronavirus : लंडन : कोरोना व्हायरसने जगभरातील जवळपास १९९ देशांना वेढा घातला आहे. त्यामुळे सर्वच देशांमध्ये लॉकडाऊनची परिस्थिती आहे. अशा परिस्थितीतही युनायटेड किंगडम (युके)मध्ये एक हटके मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती.

लॉकडाऊन दरम्यान युनायटेड किंगडमच्या एका धावपट्टूने त्याच्या घरामागील अंगणात धावून मॅरेथॉन यशस्वीरित्या पूर्ण केली. गॅरेथ ऍलन नावाच्या या धावपट्टूने स्वत:च्या बागेत सुमारे १०६४ फेऱ्या धावून मॅरेथॉन पूर्ण केली. दरम्यान त्यांनी त्याची ही मॅरेथॉन फेसबुकवरून थेट प्रक्षेपित केली असल्याने लाखो प्रेक्षकांना ती पाहता आली.

साऊथहॅम्प्टनच्या ४७ वर्षीय गॅरेथ ऍलनने या आव्हानापूर्वी धावपट्टूच्या जगाला सांगितले की, ‘चीन मधील कोविड -१९ लॉकडाऊन दरम्यान वुहानमधील एका चिनी माणसाने त्याच्या फ्लॅटमध्ये ५० कि.मी.धावून पूर्ण केले होते, या कल्पनेने प्रेरित होऊन त्यांनी हे आव्हान स्वीकारले.

‘घराच्या मागील बागेचे अंतर मापून त्यांना धावता येईल का आणि ते हा लांबचा पल्ला गाठू शकतील का? याचा त्यांनी आधीच अंदाज घेतला. जगभरातील सध्याच्या परिस्थितीत मनोबल कायम ठेऊन माझ्यासारखा एक सामान्य व्यक्ती हे करू शकतो, तर तुम्हीसुद्धा वाईट परिस्थितीत काहीतरी चांगले घडवून आणू शकता, असा ह्या मॅरेथॉनच्या थेट प्रक्षेपण करण्यामागील उद्देश होता, असेही गॅरेथ म्हणाले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here