प्रहार जनशक्ती पक्षाच्या जामनेर तालुकाध्यक्षपदी प्रदीप गायके यांची नियुक्ती ! तर विधानसभा क्षेत्र प्रमुख मनोज कुमार महाले ! युवकांची जबाबदारी जीवन सपकाळ यांचे वर!!

0
59

प्रहार जनशक्ती पक्षाच्या जामनेर तालुकाध्यक्षपदी प्रदीप गायके यांची नियुक्ती !
तर विधानसभा क्षेत्र प्रमुख मनोज कुमार महाले !
युवकांची जबाबदारी जीवन सपकाळ यांचे वर!!

जामनेर / विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्राचे मंत्री आमदार बच्चुभाऊ कडू प्रणित प्रहार जनशक्ती संघटनेने जळगाव जिल्ह्यात जोरदार एंट्री घेतल्यानंतर पहिल्यांदाच प्रहार जनशक्ती पक्षाची जिल्हा आढावा बैठक संपन्न झाली .
या बैठकीत प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे , उत्तर महाराष्ट्र प्रमुख अनिल चौधरी , जिल्हाध्यक्ष विजयभाऊ भोसले , युवक जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांच्या हस्ते जामनेर तालुक्याचे अध्यक्ष म्हणून प्रदीप गायके , जामनेर विधानसभा क्षेत्र प्रमुख म्हणून मनोजकुमार महाले , युवक विधानसभा क्षेत्र प्रमुख जीवन सपकाळ यांची निवड करण्यात आली .
या आढावा बैठकीचे आयोजन तेली समाज मंगल कार्यालय भुसावळ याठिकाणी करण्यात आले होते. आढावा बैठकीत पक्षाचे ध्येय धोरण तसेच पक्षाची पुढील रचना कशी असेल याविषयी चर्चा होऊन आगामी सर्व निवडणुका बळावर लढवण्याची घोषणा करण्यात आली. निवडणुकांसाठी तयार राहण्याचे आवाहन आलेल्या सर्वच प्रमुख वक्त्यांनी केले .
या कार्यक्रमात जामनेर तालुक्यातील लहासर येथील भाजपातील अनेक कार्यकर्त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला.
————————————
*जामनेर तालुक्यात प्रहारचा विस्तार ,प्रचार ,प्रसार करणार !*
*तालुकाध्यक्ष प्रदीप गायके!*

प्रहार जनशक्ती पक्ष संघटना ही सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असून शेती ,आरोग्य ,शिक्षण ,अपंगांचे प्रश्न ,बेरोजगारी,सामाजिक आरोग्य इत्यादी क्षेत्रांमध्ये न्याय मिळवून देण्याचे काम करते .प्रहार जनशक्ती संघटनेचे नेते नामदार बच्चुभाऊ कडू यांचा महाराष्ट्रात मोठा दबदबा निर्माण झाला आहे .सडेतोड आणि परखडपणे कार्य करणारी संघटना आहे .भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी प्रहार संघटनेचे मोठे योगदान आहे ! शेतकऱ्यांच्या पाठीशी कायमच प्रहार संघटना उभी राहिली आहे .या संघटनेकडे आता तरुणाई वळायला लागली आहेत 30 – 35 वर्षापासून भूल थापा देऊन बळी पडलेले तरुण आता जळगाव जिल्ह्यात आणि जामनेर तालुक्यात प्रहार संघटनेकडे वळायला लागले आहे. ही एक चांगली सुरुवात आहे ! लवकरच जामनेर तालुक्यात गावोगावी प्रहार जनशक्ती संघटनेचा प्रचार-प्रसार आणि विस्तार करण्यात येणार आहे.लोकांनी त्यांच्या समस्या मांडाव्या.
——————————-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here