महाराष्ट्रात आज, उद्या अतिमुसळधार

0
133

पुणे ; आयबीएन एकमत वृत्तसेवा : आंध्र प्रदेशात आलेल्या ‘गुल- आब’ चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातही दोन दिवस दिसणार आहे. हवामान विभागाने अनेक ठिकाणी दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

बंगालच्या उपसागरात 24 सप्टेंबर रोजी ‘गुल – आब’ चक्रीवादळाची निर्मिती झाली. त्यानंतर ते आंध्र प्रदेशात रविवारी दुपारी तीन वाजता धडकले. परिणामी, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर तुफान पाऊस सुरू आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे.

‘गुल- आाब’ चक्रीवादळ आंध्र प्रदेशात धडकताच महाराष्ट्रात त्याचा परिणाम लगेच जाणवला. सकाळपासून राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण दिसून आले. बर्‍याच भागांत मुसळधार पाऊस झाला.

15नंतर मान्सून परतणार

सप्टेंबरपासून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होतो. मात्र, गेल्या चार-पाच वर्षांपासून मान्सूनच्या परतीचा प्रवास 10 ते 12 सप्टेंबरदरम्यान सुरू झाला आहे. यंदा मान्सूनचा मुक्काम वाढल्याने परतीचा पाऊसदेखील 15 ऑक्टोबर पुढेच सुरू होईल, असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

27 सप्टेंबर

रेड अ‍ॅलर्ट : चंद्रपूर. ऑरेंज अ‍ॅलर्ट : नाशिक, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड, यवतमाळ. यलो अ‍ॅलर्ट : उर्वरित संपूर्ण राज्यात.

28 सप्टेंबर

रेड अ‍ॅलर्ट : धुळे, जळगाव, पालघर, ठाणे, रायगड. ऑरेंज अ‍ॅलर्ट : नंदुरबार, नाशिक, पुणे, नगर, औरंगाबाद, रायगड, सातारा, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशीम, बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here